HomeUncategorizedठाकरे बंधू एकत्र या! - मुंबईनंतर आता ठाण्यातही बॅनर- शिवसैनिक - मनसैनिकाने...

ठाकरे बंधू एकत्र या! – मुंबईनंतर आता ठाण्यातही बॅनर- शिवसैनिक – मनसैनिकाने घातली साद.( “साहेब आता तरी एकत्र या”,- ठाण्यातही लागले मनसे – शिवसैनिकाचे एकत्रित बॅनर! )

ठाकरे बंधू एकत्र या! – मुंबईनंतर आता ठाण्यातही बॅनर- शिवसैनिक – मनसैनिकाने घातली साद.
( “साहेब आता तरी एकत्र या”,- ठाण्यातही लागले मनसे – शिवसैनिकाचे एकत्रित बॅनर! )

ठाणे :- प्रतिनिधी.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या २ दिवसांपूर्वी एक राजकीय भूकंप घडला. ज्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. अजित पवारांसह ९ राष्ट्रवादी आमदारांनी थेट सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली.तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आणि राज्यात राजकीय उलथा पालथ सुरु झाल्या आहेत. मुंबईत मनसे आणि शिवसैनिकांनी उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे यासाठी बॅनरबाजी केली आहे.त्यात आता ठाण्यातही मनसे आणि शिवसैनिकांनी ठाण्यात साहेब आता तरी एकत्र या अशी साद घालणारे बॅनर लावले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा राज, उद्धव एकत्र येण्यासाठी शिवसैनिक आणि मनसैनिक आतुर झाल्याचेच दिसत आहे.

एक वर्षापूर्वी शिवसेनेतून फुटून शिंदे यांनी वेगळा गट तयार केला आणि भाजप बरोबर सत्तेत सहभागी झाले. त्यानंतर आता बरोबर एक वर्षानंतर राष्ट्रवादीतही फुट पडली आणि अजित पवार यांनी वेगळी चुल मांडली व सत्तेत सहभागी झाले. त्यामुळे राज्यातील राजकारण कोणत्या पातळीवर गेले आहे, याची चुणक आता सर्वांनाच लागली आहे. त्यामुळे या सर्वांना रोखायचे असेल तर उद्धव आणि राज ठाकरे यांनी एकत्र यावे अशी साद घातली जात आहे. वर्षभरापूर्वी देखील अशीच साद दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घातली होती. त्यानंतर आता पुन्हा तशीच साद आता मनसे आणि शिवसेनेचे कार्यकर्ते घालू लागले आहेत.

सोमवारी दादरच्या शिवसेना भवनासमोर एका कार्यकर्त्याने बॅनर लावून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना एकत्र येण्याचे आवाहन केले. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झालाय. आता तरी एकत्र या असं या पोस्टरमध्ये कार्यकर्ता लक्ष्मण पाटील यांनी लिहिले होते. मुंबईनंतर आता ठाण्यात ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली आहे. या बॅनरवर महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक यांनी एकच सूर आवळत राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.तर ठाण्यात लागलेल्या याच आशयाच्या बॅनरने सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. या बॅनरवर साहेब आता तरी एकत्र या अशी साद घातली गेली आहे. महाराष्ट्राला तुमची खूप गरज आहे… बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्याची हीच वेळ आहे… आम्हाला महाराष्ट्रात फक्त ठाकरे सरकार पाहिजे असे देखील या बॅनरवर नमुद करण्यात आले असून साहेब एकत्र या… असे म्हंटले आहे. त्यावर मनसेच्या प्रविण बेलोसे आणि शिवसेनेच्या प्रविण उतेकर यांच्या नावाचा उल्लेख आहे. बॅनरच्या मध्यभागी बाळासाहेबांचे छायाचित्र असून त्यांच्या दोन्ही बाजूला राज आणि उद्धव ठाकरे यांचे छायाचित्र असल्याचे दिसत आहे.

ठाणे शहरामध्ये उद्धव ठाकरे व राज ठाकरे एकत्र यावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक यांच्या वतीने “साहेब आता तरी एकत्र या” अशा आशयाचा बॅनर लावला आहे. महाराष्ट्राला तुमची खूप गरज आहे, बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हीच वेळ आहे. आम्हाला महाराष्ट्रात फक्त ठाकरे सरकार हवा आहे असा आशय असलेले बॅनर शहरांमध्ये तीन पेट्रोल पंपाठिकाणी लावण्यात आलेले आहेत.

मनसे नेत्याचे सूचक विधान

जनभावनेचा सन्मान केलाच पाहिजे. लोकशाहीत मत मांडण्याचा अधिकार आहे. युती होईल का नाही हे दोन्ही बाजूने ठरवले पाहिजे. राजकीय गणित कशी जुळवावी लागतात. भविष्यात काय होईल सांगता येत नाही. ठाकरे बंधु एकत्र येतील का हे काळच ठरवेल. जनता व्यक्त होत असते. पुढे काय होईल हे आगामी काळात कळेल असं सांगत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मनसे-उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर सूचक विधान केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.