अल्पवयीन मुलीला पळवून नेल्या प्रकरणी.- राधानगरी येथील पंकज निकम याला सिंधुदुर्ग विशेष न्यायालयाने सुनावली ६ जुलै पर्यंत पोलीस कोठडी
वेंगुर्ले:-प्रतिनिधी.
वेंगुर्लेतील एका अल्पवयीन मुलीला आरोपी पंकज गौतम निकम, वय 19 वर्षे, रा. राधानगरी, कोल्हापूर याने 25 जून 2023 रोजी पळवून नेलेले होते. सदर गुन्ह्याच्या तपासात आरोपी हा अल्पवयीन मुली सोबत तेंडोली, ता. कुडाळ येथील बागेत असल्याची माहिती मिळाल्याने सदर अल्पवयीन मुलीस दि. 3 जुलै 2023 रोजी वेंगुर्ला पोलिसांनी ताब्यात घेतले.पीडित मुलीकडे चौकशी करता तपासात आरोपी याने तिच्याशी शरीर संबंध ठेवल्याचे समजून आल्याने गुन्ह्यास भा. द. वि. क 376 (1) (अ), (2) (n), (3), pocso 4,6 ही कलमे वाढविण्यात आलेली आहे.
दरम्यान गुन्ह्याच्या कामी आरोपीला वेंगुर्ले पोलीसांनी अटक करून त्याला ओरोस येथील विशेष न्यायालय सिंधुदुर्ग येथे हजर केले असता. मा. न्यायालयाने त्याला दि. 6 जुलै 2023 रोजी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.सदर गुन्ह्याचा तपास पोलीस वेंगुर्ले.पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा/1005 सुरेश पाटील, मापोहवा/13 चौहान, मपोकॉ/भाटे मापोहवा/149 धुरी हे करीत आहेत.
