Homeकोंकण - ठाणेआजरा - कानोली लालपरी फेरी सुरू..प्रवासी वर्गातून समाधान. सरपंच सौ. पाटील यांच्या...

आजरा – कानोली लालपरी फेरी सुरू..प्रवासी वर्गातून समाधान. सरपंच सौ. पाटील यांच्या प्रयत्नांना यश.

आजरा – कानोली लालपरी फेरी सुरू..प्रवासी वर्गातून समाधान. सरपंच सौ. पाटील यांच्या प्रयत्नांना यश.

आजरा ( प्रतिनिधी )

आजरा-कानोली महागाव ही एस.टी सेवा दि.३ जुलै पासून नियमित सुरू झाली आहे. आजरा आगारातून सुटणारी ही एस.टी सायंकाळी ७.१५ वा आजरा हुन महागाव पर्यंत जाईल त्यांनतर ही बस पुन्हा ८.२० वा. महागाववरून सुटून कानोली येथे वस्तीस येईल आणि सकाळी ६.२० वाजता महागाव पर्यंत जाऊन पुन्हा आजाराकडे ६.४५ वा. रवाना होईल. या लालपरी एस. टी सेवेमुळे शाळेचे व कॉलेजचे विध्यार्थी तसेच प्रवासी वर्गाच्या सोय झाली आहे.
आजऱ्यातून सायं ४ नंतर बससेवा सुरू न्हवती शिवाय पूर्वीची सायंकाळ ७ ची हलकर्णी बस फेरी रद्द झाली होती. त्यामुळे प्रवाशांची कुचंबना होत होती. सकाळची कागीनवाडी -गड. एस.टी कानोली पासून महागावपर्यंत विना थांबा न्हवती त्यामुळे विद्यार्थी वर्गाची मोठी गैरसोय होत होती. ही गरज ओळखून कानोली गावच्या सरपंच सौ.सुषमा पाटील यांनी आजरा आगाराकडे पाठपुरावा केला त्यामुळे ही एस.टी सेवा सुरू करणेकामी विभागीय सहनियंत्रक श्री. भोगरे आगरप्रमुख श्री. चव्हाण यांचे विशेष सहकार्य लाभले आज दि. ४ रोजी सकाळी एस.टी चे पूजन सरपंच सौ.सुषमा पाटील, ग्रा.प.सदस्य सुधीरकुमार पाटील, अनिल पाटील, चंद्रकांत पाटील, सारिका भोसले यांच्यासह पोलीस पाटील अनिल मुरूकटे, श्रीपती देसाई,चंद्रकांत आपगे ,चंद्रकांत पाटील,शिवाजी पाटील, बाजीराव पाटील पंडितराव पाटील,परशुराम आपगे, विलास मुरूकटे दत्ता भोगण आनंदा देसाई,बळवंत पाटील,विनायक सावरतकर, जैमलसिंह देसाई जयवंत सुतार, रवींद्र पाटील यांच्यासह चालक संतोष रेडेकर व वाहक पुजारी ग्रामस्थ उपस्थित होते .आभार सुभाष पाटील यांनी मानले..
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.