Homeकोंकण - ठाणेरविवारी मालवणसह,वेंगुर्ले तालुक्यालाही मोठा तडाखा.अनेक भागात झाडाची मोठी पडझड.

रविवारी मालवणसह,वेंगुर्ले तालुक्यालाही मोठा तडाखा.अनेक भागात झाडाची मोठी पडझड.

रविवारी मालवणसह,वेंगुर्ले तालुक्यालाही मोठा तडाखा.अनेक भागात झाडाची मोठी पडझड.

मालवण. प्रतिनिधी.

केळुस कालवीबंदर येथेही रविवारी समुद्र किनाऱ्यावरील राहणाऱ्या मच्छीमाऱ्यांची या चक्रिवादळा मुळे उडाली मोठी धांदल तर सुरक्षित ठिकाणी हलविल्या आपल्या होड्या, तर शासनाने बांधलेल्या जेटीवरूनही कालवीबंदर वाडीत शिरले पाणी. तर केळुस गावात काही ठिकाणी विद्युत लाईनवर झाडे पडल्याने विदयुत पुरवठा रविवार पासून झाला खंडित

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने रविवारी वेंगुर्ले, मालवण तालुक्याच्या किनारपट्टीवर तडाखा देण्यास सुरुवात केली असून पहाटे पासून सुरू झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली आहे रात्री पासून संततधार कोसळणाऱ्या पावसाने आता जोरदार बरसने सुरू केले आहे.

देवबाग येथे माडाची झाडे मोडून पडली असून दोन वीज खांब कोसळले आहे तर मालवण देऊलवाडा येथे पोफळीच्या झाडांचे नुकसान झाले आहे काल रात्रीपासून महाराष्ट्राच्या किनाऱ्याकडे वाटचाल सुरू झाल्यानंतर मध्यरात्रीपासून मालवणसह जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात वारा व संततधार पाऊस सुरू झाला. तर आज पहाटेपासून जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने संततधार सुरू असून अनेक ठिकाणी झाडे पडून नुकसान झाले आहे. मध्यरात्रीपासून मालवण शहरासह तालुक्यात वीज पुरवठा खंडित झाला असून सर्वांचीच झोप उडाली आहे. समुद्रातील या वादळामुळे समुद्रही खवळला असून उंचच उंच लाटा किनाऱ्यावर धडकत आहेत. पहाटे पासून वादळाचा प्रभाव अधिक वाढला असून किनारी भागात जोरदार वादळी वारे वाहू लागल्याने अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास देवबाग सामंत वाडी येथील निळकंठ सामंत यांचा माड रस्त्यावर कोसळल्याने दोन वीज खांबही मोडून पडले. तर देवबाग ख्रिश्चनवाडी येथे आंतोन रॉडिक्स व अनिल मोंडकर यांच्या रिसॉर्टच्या शेडवर झाड कोसळून नुकसान झाले आहे. देवबाग येथील मोनिका फर्नाडिस यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले तर मालवण चौके मुख्य रस्त्यावर देखील झाड कोसळून वाहतूक ठप्प झाली होती. हे झाड प्रशासन व स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाजूला करण्यात आले आहे. मालवण शहरात देखील काही ठिकाणी पडझड झाली असून शहरातील वीज पुरवठा खंडित झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.