अर्धवट गटारीचे बांधकाम – गटारी स्वच्छता करावी अन्यथा.- गटारीची घाण पालिकेत टाकू . – मुख्याधिकारी
गडहिंग्लज यांना मनसेचे निवेदन.
गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

गडहिंग्लज हद्दीतील धबधबा मार्ग काळभैरी रोड या ठिकाणी ७ -८ महिन्या पूर्वी गटाराचे काम सुरु केले होते ते अर्धवट बांधकाम करून ठेकेदाराने काम तशाच अवसतेत काम बंद ठेवले आहे, या अर्धवट कामामुळे होणाऱ्या पावसाच्या पाण्याचा निचरा व दुर्गध युक्त पाणी रस्त्यावर साचून आजू बाजूच्या घरामध्ये पाणी शिरून आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे तात्काळ ठेकेदाराला सांगून उर्वरित गटाराचे काम पूर्ण करून घ्यावे व असलेल्या गटारीची कित्तेक महिने गटार साफ केली नसून व आजूबाजूने झाडे झुडते वाढली असून घाणीचे साम्राज्य तयार झाले आहे ते तात्काळ स्वछ करून घ्यावे व परिसरातील नागरिकांना सार्वजनिक सौचालयाची व्यवस्त केली असून पाण्याची टाकी व नळ कनेक्शन याची व्यवस्त केलेली नाही त्यामुळे सौचालयाची स्वच्छता ही होत नसून सौचालयामध्ये घाणीचे साम्राज्य दिसून येते त्यामुळे नागरिकांना सौचालयास जाणे अवघड होतं आहे. तसेच परिसरातील साफ-सफाई कधीच होत नाही त्याच बरोबर २० वर्षा पूर्वी नळ कनेक्शन टाकले आहे त्यामुळे बऱ्याच वेळेला लिकीजचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी नवीन पाईपलाईन टाकून घ्यावे या सर्व समश्याचे तात्काळ निर्सन होईल ही अपेक्षा तसे नझाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने गटारीत घाण व सौचालयातील घाण पालिकेत आणून टाकु होणाऱ्या परिणामास नागरपालीका प्रशासन जबाबदार राहील अशा अशायाचे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनावर नागेश चौगले जिल्हा अध्यक्ष कोल्हापूर, केंप्पान कोरी शहर अध्यक्ष गड. तसेच मनसैनिक
राहुल जाधव, अमोल गोडसे, प्रशांत देवार्डे, सुभाष दिवेकर, सुभाष देवार्डे, अथर्व कांबळे, रोहन देवार्डे, सुशांत देवार्डे, आदींच्या सह्या आहेत.
