Homeकोंकण - ठाणेराष्ट्रीय महामार्ग - आजरा तालुक्यातील साकवा वरील रस्त्याची डागडुजी करा. - अन्यथा...

राष्ट्रीय महामार्ग – आजरा तालुक्यातील साकवा वरील रस्त्याची डागडुजी करा. – अन्यथा सोमवारी रास्ता रोको. ( आजरा तहसीलदार यांना मनसेचे निवेदन. )

सह्याद्री.. इफेक्ट….

राष्ट्रीय महामार्ग – आजरा तालुक्यातील साकवा वरील रस्त्याची डागडुजी करा. – अन्यथा सोमवारी रास्ता रोको. ( आजरा तहसीलदार यांना मनसेचे निवेदन. )

आजरा. – प्रतिनिधी.

महाराष्ट्र नवनिर्माण सेना आजरा यांच्या वतीने आजरा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की मागील एक वर्षापासून राष्ट्रीय महामार्ग संकेश्वर – बांदा पर्यंत चे काम चालू आहे. त्यामध्ये साकवाचे आजरा तालुक्यातील फक्त काम पूर्ण केले आहे. साकावाचे काम करत असताना (१) सदर ओड्यातील माती बाजूच्या शेतकन्याच्या शेतामध्ये टाकली आहे. पण काम चालू आहे परंतु सदर माती दगड काढलेले नाहीत त्यामुळे शेताची मशागत व पेरणी कशी करायची? (२) सदर ओढ्यातून पावसाचे जात असलेले पाणी शेतामध्ये जावून शेतपिकाचे नुकसान होणार आहे. त्यामुळे पायाचा मार्ग खुला करून पाणी मार्गस्थ करावे जेणेकरून पावसाचे पाणी शेतकन्याच्या शेतामध्ये जाणार नाही गांची दहा ३) साकव बांधताना खोदलेला रस्ता नादुरुस्त व धोकादायक आहे या ठिकाणावरून अपघात होत आहेत यासाठी रस्त्याची पावसात टिकावी अशी तात्पुरती डागडुजी करावी
(४) सदर राष्ट्रीय महामार्ग चे काम चालू आहेच या मार्गावरून सतत आपले अधिकरी फिरत असतात या अपघातग्रस्त रस्त्याविषयी कोणीतरी सांगितल्यावरच आपण करावे हे लज्जास्पद आहे यासाठी आपण वरील दिलेल्या सूचना तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा सोमवार दि ०३/०७/२०२३ रोजी हाजगोळी तिट्टा (साक पुल) याठिकाणी जिल्ह्यातील रि पधाधिकान्यांच्या नेतृत्वाखाली व आजरा तालुका पदाधिकारी वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल तरी या बाबत राष्ट्रीय महामार्ग सक्षम अधिकारी यावेशी चर्चा करून शुक्रवार ३०/०६/२०२३ रोजी बैठक बोलवावी व या बैठकीस मनसे पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर सुधिर सुपल जिल्हा उपाध्यक्ष, अनिल निऊगरे तालुका अध्यक्ष, आनंदा घंटे ता. उपाध्यक्ष,
चंद्रकांत सावरेकर ता. सचिव. महिला आघाडी तालुका अध्यक्ष सरिता सावंत उपाध्यक्ष तेजस्विनी देसाई, मविसेना अश्विन राणे जिल्हा उपाध्यक्ष, तालुका वि. सेना अध्यक्ष वैष्णव दळवी सह पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.