वरखेडा विद्यालयात जागतिक ऑलिम्पिक डे निमित्त रन अँड वॉक स्पर्धा उत्साहात संपन्न.
नाशिक. – प्रतिनिधी.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्था संचलित जनता विद्यालय वरखेडा येथील विद्यालयात जागतिक ऑलिम्पिक डे निमित्त डे अँड वॉक उपक्रमांतर्गत विद्यालयात धावण्याच्या स्पर्धा मोठा उत्साहात संपन्न झाल्या. या निमित्त शालेय समिती अध्यक्ष प्रकाश भुसाळ, वरखेडा आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ.स्नेहल मोरे मॅडम, नंदकुमार काळोगे,योगगुरू वसंतराव उफाडे,राहुल जमदाडे,जगदीश वडजे तसेच इतर उपस्थित पाहुण्यांनी या स्पर्धेला हिरवा झेंडा दाखवला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मा.मुख्याध्यापक श्री.पुरुषोत्तम थोरात यांनी केले. जागतिक ऑलिम्पिक स्पर्धेची सुरुवात प्रथम १८९६ साली अथेन्स या ग्रीस देशात झाली. या साली अमेरिकन खेळाडू जेम्स कोन्नोली या खेळाडूने ऑलिम्पिक स्पर्धेस प्रथम ऑलिम्पिक पदक मिळवले या दिवसाने खऱ्या अर्थाने गतिमानता दिली म्हणून २३ जून हा दिवस महत्वाचा आहे असे आपल्या मनोगतात अध्यक्ष प्रकाश भुसाळ आणि नंदूकुमार काळोगे यांनी संयुक्तरित्या सांगितले.
धावण्याची स्पर्धा इयत्ता- ५ वी ते १० च्या विद्यार्थ्यांत चार गटात घेण्यात आल्या.प्रत्येक गटातून दोन विद्यार्थ्यांची निवड केली. ऑलिम्पिक दिवसाचे महत्व देवयानी देशमुख आणि सृष्टी भावले या विद्यार्थिनींनी सांगितले.विद्यालयातील उपशिक्षका गायत्री पवार मॅडम यांनी ऑलिम्पिक ध्वजावर सिटीयस,ऑल्टीयस, फॉर्टियस असे लिहिले आहे.म्हणजेच गतिमानता,उच्चता,आणि तेजस्विता असा त्याचा अर्थ आहे.त्यामुळे प्रत्येकाने या स्पर्धेतून आव्हानात्मक जीवन जगले पाहिजे.असे आपल्या मनोगतातून सांगितले.
धावतांना विद्यार्थ्यांना दुखापत होवू शकते ? दुखापत झाल्यास उपयोजना म्हणून वरखेडा आरोग्य केंद्राचे मुख्य आरोग्य अधिकारी डौले साहेब यांनी रुग्णवाहिके (Ambulance) ची सुविधा विद्यार्थ्यांना पुरवून सहकार्य केले. कार्यक्रम यशस्वीते साठी पर्यवेक्षक श्री.बाळासाहेब पाटील,क्रीडा श्री.सुभाष मालसाने सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी* यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षक संजय जाधव यांनी तर आभार सुभाष मालसाने यांनी मानले. कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
