Homeकोंकण - ठाणेदिवसाच्या सविस्तर बातम्या.१)कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण.- आरोपी समीर गायकवाडला साक्षीदाराने ओळखले२)...

दिवसाच्या सविस्तर बातम्या.१)कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण.- आरोपी समीर गायकवाडला साक्षीदाराने ओळखले२) दहशतवाद हा माणुसकीचा शत्रू- पंतप्रधान नरेंद्र मोदी३) मोदी सरकारला ९ वर्ष पुर्ण – अंतर्गत रत्नागिरीत आज भाजपातर्फे व्यापारी मेळावा

दिवसाच्या सविस्तर बातम्या.
१)कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण.- आरोपी समीर गायकवाडला साक्षीदाराने ओळखले
२) दहशतवाद हा माणुसकीचा शत्रू- पंतप्रधान नरेंद्र मोदी
३) मोदी सरकारला ९ वर्ष पुर्ण – अंतर्गत रत्नागिरीत आज भाजपातर्फे व्यापारी मेळावा

कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरण.- आरोपी समीर गायकवाडला साक्षीदाराने ओळखले
साक्षीदारांच्या यादीतील हा सहावा पंच व साक्षीदार.

मुंबई. – प्रतिनिधी..

कॉम्रेड गोविंद पानसरे खून प्रकरणातील संशयित समीर विष्णू गायकवाड (रा.सांगली) याच्याकडून अटकेवेळी जप्त केलेले दोन मोबाईल पंच साक्षीदाराने न्यायालयात ओळखले. पंचाने गायकवाडलाही जागेवर जाऊन ओळखले. साक्षीदारांच्या यादीतील हा सहावा पंच आणि साक्षीदार आहे. पानसरे खून खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांच्यासमोर मंगळवारी झाली. त्यात पंच साक्षीदार नितीन मंगेश जाधव यांचा सरतपास आणि उलट तपास झाला. पुढील सुनावणी 3 आणि 4 जुलैला होणार आहे. विशेष सरकारी वकील शिवाजीराव राणे यांच्यासह सर्व संशयित आणि त्यांचे वकील न्यायालयात हजर होते. सुनावणीस प्रारंभ झाल्यानंतर ॲड. राणे यांनी पंच जाधव यांना समीर गायकवाडला अटक केली तेव्हा काय काय झालं? काय जप्त केलं? आदी प्रश्न विचारतानाच इतर प्रश्नही विचारले. उत्तरात पंच जाधव यांनी गायकवाडकडे अंग झडतीवेळी एक स्मार्टफोन आणि एक साधा फोन मिळाल्याचे सांगितले. मध्यरात्री साडेतीनच्या सुमारास राजारामपुरी पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक अमृत देशमुख यांनी बोलविल्यामुळे मी आणि माझा शेजारचा मित्र करण शंभू यादव पोलीस ठाण्यात गेलो होतो. यावेळी त्याच्या अंगात ग्रे टी-शर्ट आणि चॉकलेटी पॅन्ट होती. पॅन्टच्या खिशातून मोबाईल संच जप्त केल्याचे जाधव यांनी सांगितले. त्याच्या अंगावरील खुणा तपासून पोलिसांनी अटकेचा पंचनामा केला. आरोपीला ओळखू शकाल का? असे विचारल्यावर जाधव यांनी बोट करून समीर गायकवाड हाच असल्याचे दाखविले. नंतर संशयित बसलेल्या ठिकाणी जाऊन इतर संशयितांमध्ये बसलेला गायकवाड हाच असल्याचे सांगितले. संशयितांतर्फे ॲड. रवींद्र इचलकरंजीकर, ॲड. समीर पटवर्धन, ॲड. प्रवीण करोशी, ॲड. ए. एस. रुईकर आणि ॲड. डी. एम. लटके यांनी पंच आणि साक्षीदार जाधव यांची उलट तपासणी घेतली. दरम्यान, अटक पंचनाम्यावेळी पोलिसांनी जप्त केलेले मोबाईल ओळखण्यासाठी न्यायाधीश तांबे यांच्यासमोर बॉक्स हजर करण्यात आला. सुरुवातीला, दुसराच बॉक्स उघडण्यात आला. संशयित आरोपी समीर गायकवाडचे दोन्ही मोबाईल एकाच ठिकाणी मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्ष समीरचा एक आणि दुसरा कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा मोबाईल आढळून आला. दरम्यान, खटल्यातील सुनावणीसाठी सर्व संशयित आरोपींना सकाळी पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले होते.

दहशतवाद मोडून काढण्यासाठी अमेरिका आणि भारताला संयुक्त पावलं उचलावी लागतील.- पंतप्रधान नरेंद्र मोदी.


दहशतवाद हा माणुसकीचा शत्रू आहे. हा दहशतवाद मोडून काढण्यासाठी योग्य पद्धतीने लढावं लागेल. आपल्या देशांची एकजूट या दहशतवादाचा सामना करु शकते. मुंबईवर जो दहशतवादी हल्ला झाला त्यानंतरही दहशतवादाचा धोका आहेच. त्याचा बिमोड करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता आहे.असे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी अमेरिकेच्या संसदेला संबोधित करताना स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. आपल्या भाषणात त्यांनी AI चा नवा अर्थही सांगितला. AI म्हणजे अमेरिका – इंडिया असं नरेंद्र मोदी म्हणाले.
आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रशिया आणि युक्रेन युद्धाचाही उल्लेख केला. ते म्हणाले “ही वेळ युद्धाची नाही. युक्रेनमध्ये सुरु असलेला रक्तपात थांबणं आवश्यक आहे. युद्धामुळे लोकांना प्रचंड त्रास होतो. मात्र चर्चा केल्याने अनेक गोष्टींमधून मार्ग निघू शकतो. रशिया आणि युक्रेन यांच्या फेब्रुवारी २०२२ पासून युद्ध सुरु आहे. भारतातर्फे दोन्ही देशांना शांततेचं आवाहन करण्यात आलं आहे.”
“भारतात विविधेत एकता आहे. आज जगाला भारताविषयी माहिती हवी आहे, भारतात काय सुरु आहे? याची जिज्ञासा जगभरात अनेकांना असते. मी या सदनातही ती जिज्ञासा पाहू शकतो. भारताचा विकास, तिथली लोकशाही आणि विविधेत असलेली एकता या सगळ्या गोष्टी प्रत्येकाला समजून घ्याव्याश्या वाटत आहेत. भारत एखादी गोष्ट कशी करतो? कोणत्या गोष्टीला कसं तोंड देतो? याकडे जगाचं लक्ष असतं.” “आधी भारत हा जगातली दहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश होता. मात्र आता भारत जगातली पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. २०२५ पर्यंत भारत जगातली तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश होईल याबाबत माझ्या मनात शंका नाही. भारतात विकासाला प्रचंड मोठी गती मिळाली आहे.” असंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

मोदी सरकारला ९ वर्ष पुर्ण – अंतर्गत रत्नागिरीत आज भाजपातर्फे व्यापारी मेळावा

रत्नागिरी :- प्रतिनिधी.

केंद्रातील मोदी सरकारला ९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आज रत्नागिरीत भाजपाच्या वतीने व्यापारी मेळाव्याचे आयोजन केले आहे. आज सायंकाळी ५.०० वाजता पऱ्याची आळी येथील गुरुकृपा मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे.
सेवा, सुशासन व गरीब कल्याण साधणारे केंद्र सरकार ९ वर्षे पूर्ण करत आहे. यानिमित्त मोदी @ ९ हे अभियान देशभरात राबवण्यात येत आहे. सरकारची व्यापारी धोरणं, व्यापारी वर्गाच्या अपेक्षा, व्यापारी बंधूंचे मनोगत अशा विषयांवर चर्चा करण्यासाठी सर्व व्यापारी बांधवांचे एकत्रीकरण आज मेळाव्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. याकरिता सर्व व्यापारी बंधूंनी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन भाजपाने केले आहे.
या मेळाव्याला भाजपाचे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख प्रमोद जठार, प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन, रत्नागिरी विधानसभा प्रमुख बाळ माने उपस्थित राहणार आहेत. रत्नागिरी शहर, तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन व्यापारी मेळावा संयोजक तथा भारतीय जनता युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम जैन, भाजपा शहराध्यक्ष सचिन करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख उमेश कुळकर्णी यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.