Homeकोंकण - ठाणेशासन आपल्या दारी अभियान.- शासन स्तरावर उत्तुर येथे होणार. २५ रोजी -...

शासन आपल्या दारी अभियान.- शासन स्तरावर उत्तुर येथे होणार. २५ रोजी – लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.- आजरा तहसीलदार समीर माने यांची पत्रकार परिषदेत माहिती.

शासन आपल्या दारी अभियान.- शासन स्तरावर उत्तुर येथे होणार. २५ रोजी – लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा.- आजरा तहसीलदार समीर माने यांची पत्रकार परिषदेत माहिती.

आजरा. – प्रतिनिधी.

शासन आदेशानुसार आजरा तालुक्यातील उतूर येथील उत्तुर विद्यालय व जुनिअर कॉलेज या ठिकाणी दि. २५ जुन २०२३ रोजी दु. ११ ते ४ या वेळेत जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांच्या अध्यक्षतेखाली व या विभागातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शासन आपल्या दारी अभियान शासकीय स्तरावर होणार असल्याची पत्रकार परिषदेत माहिती दिली यावेळी तहसीलदार श्री माने बोलताना म्हणाले. उत्तुर येथे होणारे हे अभियान शासन स्तरावर होत आहे १३ एप्रिल २०२३ शासन जी.आर नुसार शासनाच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सदर अभियान राबवले जात असून तालुक्यातील सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. या अभियानामध्ये शैक्षणिक दाखले संजय गांधी निराधार योजना, जातीचे दाखले, आधार कार्ड अपडेट, जेष्ट नागरिक एसटी पास दाखला यामध्ये काही प्रलंबित राहिलेले दाखले व अन्य योजनांची माहिती लाभार्थी यांना देण्यात येणार आहे. यासाठी शासकीय स्तरावर सर्व अधिकाऱ्या समावेत लाभार्थ्यांची लवकरात लवकर कामे व्हावी हा यातील प्रमुख उद्देश आहे. काही लाभार्थ्यांच्या प्रकरणांमध्ये असलेल्या त्रुटी पूर्ण करून देण्यात येणार आहे. वेगवेगळ्या योजनेसाठी लाभार्थ्यांनी अर्ज करावे तसेच या उत्तुर जिल्हा परिषद मधील २२ गावचा समावेश करण्यात आलेला असून जास्तीत जास्त लाभार्थी यांनी उपस्थित राहणे कामी प्रत्येक गावातील सरपंच शासकीय अधिकारी त्यांच्यावर जबाबदारी दिली आहे. विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी व आपले शैक्षणिक दाखले अन्य योजनेचा लाभार्थी पात्र असल्यास संबंधित योजनेसाठी लागणारी कागदपत्रे जमा करून आपण आपल्या योजनेचा लाभ घेण्याचे आहे. यासाठी प्रशासन आपल्या पाठीशी असल्याचे पत्रकार परिषदेत बोलताना तहसीलदार श्री. माने म्हणाले. यावेळी निवासी नायब तहसीलदार श्री देसाई, श्री. कोलते विभागातील तलाठी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.