HomeUncategorizedआजरा पोलीस ठाणेस नुतन पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांची सदिच्छा भेट व

आजरा पोलीस ठाणेस नुतन पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांची सदिच्छा भेट व [ सी. सी. टिव्ही कॅमेरा शुभारंभ कार्यक्रम सपन्न ]

आजरा पोलीस ठाणेस नुतन पोलीस अधिक्षक कोल्हापूर यांची सदिच्छा भेट व [ सी. सी. टिव्ही कॅमेरा शुभारंभ कार्यक्रम सपन्न ]

आजरा. – प्रतिनिधी.

आजरा येथील नूतन पोलीस ठाणे इमारत व सी. सी. टिव्ही कॅमेरा शुंभारभ तसेच पोलीस ठाणेस भेट देवून पोलीस ठाणेकडील कामकाजाचा आढावा घेवून तसेच पोलीस ठाणे इमारत पाहणी केली त्या प्रसंगी आजरा शहरामध्ये आजरा पोलीस ठाणे कडील सहायक पोलीस निरीक्षक श्री. सुनिल हारूगडे यांनी आजरा शहरामध्ये होणा-या चो-या तसेच मुलीची होणारी छेडछाडी, तसेच गुन्हेगारावरती आळा बसण्यासाठी सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविण्यासाठी आजरा शहरातील नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी,बॅक, पत संस्था उद्योदक यांची बैठक घेवून सी. सी. टिव्ही कॅमेरे बसविणे का आवशक आहे तसेच पोलीसांविषयी लोकांची विश्वासार्हता वाढेल वा चांगल्या कार्यास प्रेरणा मिळेल सर्व घटनांचे चतुः रस निरीक्षण करणे सोपे होईल याबाबत मार्गदर्शन केलेनंतर उपस्थित नागरिकांनी चांगला प्रतिसाद देवून स्वखुर्शीने लोकवर्गणी दिली. त्यानुसार संपुर्ण आजरा शहरातील रहदारीच्या मुख्य ठिकाणी सी.सी. टिव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले होते. त्यावेळी उपस्थित लोक प्रतिनिधी व नागरिकांनी आजरा शहरामध्ये वाहतुकीचा प्रश्न उपस्थित केला होता. तसेच आजरा पोलीसांनी १० लाखाच्या दरोडयातील आरोपी तात्काळ अटक केलबाबत त्यांचे कौतुक केले. अशा घटना घडु नयेत म्हणून सी. सी. टिव्ही कॅमेरे पॅर्टन राबविण्यात आला त्या कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा महेंद्र पंडित पोलीस अधीक्षक साो, कोल्हापूर, निकेश खाटमोडे अपर पोलीस अधिक्षक राजीव नवले उपविभागीय पोलीस अधिकारी साो, गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला आहे. या प्रसंगी बोलताना पोलीस अधिक्षक श्री. पंडित म्हणाले आजरा पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचा तपास करून तात्काळ आरोपी अटक केलेबाबत आजरा पोलीस ठाणेकडील अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले. तसेच कोल्हापूर येथे घडलेल्या घटणेच्या अनुषंगाने सोशल मिडींयावर आश्रपार्ह पोस्ट, मजकुर, व्हिडिओ सादर करून समाजामध्ये वेगवेगळया धर्मांमध्ये तेढ निर्माण करणा-या लोकांचे विरूध्द कायदेशीर कारवाई केली जाईल असे सांगून त्यांनी आपण केलेल्या कार्याचे कौतुक केले.
यावेळी या कार्यक्रमास नगराध्यक्षा जोत्सना चराटी, सर्व नगरसेवक, व्यापारी जितेंद्र टोपले, सुभाष नलवडे, सचिन इंदलकर, राजु पोतनीस, दिलावर चाँद, सह आजरा शहरातील नागरीक उपस्थित होते. आभार श्री. राजीव नवले मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो, गडहिंग्लज विभाग गडहिंग्लज यांनी मानले.

आजऱ्यात जमिनीच्या वाटणीवरुन मारामारी,
७ जणांवर गुन्हे दाखल.

आजऱ्याजवळ असणाऱ्या बुरुडे गावात जमिनीच्या वाटणी वरुन दोन कुटुंबात मारामारी झाली आहे आजरा पोलिसांनी सात जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
आबूतालीब चाॅंद व इक्बाल चाॅंद यांच्या मध्ये जमिनीवरुन वाद आहे.10 जुन रोजी सायंकाळी ४ च्या सुमारास याच कारणावरून वाद झाला.बुरुडे शेतातील गट नं. 195 मध्ये जमीनीत माझी वाटणी आहे. मला त्यातील वाटणी पाहिजे तुम्ही जर वाटणी नाही दिला तर तुला व तुझ्या बापास सोडणार नाही असे म्हणून इक्बाल चाॅंद याने फोन करुन आपली मुले व नातेवाईक सादिक इक्बाल चाॅंद, जावेद इक्बाल चाॅंद वसीम इक्बाल चाॅंद, हजरअली अब्दुल मुल्ला, गौस अब्दुल मुल्ला, अलमास इक्बाल चाॅंद यांना बोलावून शिवीगाळी करु लागले. यावेळी हजरत अली अब्दुल मुल्ला याने आबूतालीब यांच्या उजव्या खांद्यावर काठीने मारले. गौस अब्दुल मुल्ला याने पोटावर काठीने मारले तर साजीद, जावेद, वसीम यांनी हाताने व लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच इक्बाल व त्याची बायको अलमास यांनी दगडफेक केली. यामध्ये मुलगा इरफान हा देखील जखमी झाला आहे. आजरा पोलिसांनी याप्रकरणी ७ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.】

आजऱ्यातील मारामारी पाच जणा विरुद्ध गुन्हा दाखल : –

[ खेडेकर कुटुंबाची परस्पर विरोधी तक्रार दाखल शुक्रवारी रात्री सिराज व खेडेकर यांच्या कुटुंबीयांत हाणामारी झाली होती.सिराज नंतर आता खेडेकर कुटुंबाने देखील परस्पर विरोधी तक्रार दाखल केली आहे.
वसीम बशीर खेडेकर यांनी ५ जणांच्या विरोधात आजरा पोलिसात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली आहे.या तक्रारी वरुन सादिक रहिमबक्ष सिराज, आफताब सादिक सिराज,आरिफ महमद इसाक सिराज,आसिफ महम्मद इसाक सिराज व हुजेब शकील सिराज सर्व रा. आजरा यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.या मारामारीत राहील असलम खेडेकर व वाकीब निसार खेडेकर हे जखमी झाले आहेत.राहील याला उपचारासाठी गडहिंग्लज येथे दाखल करण्यात आले होते. राहीलने गडहिंग्लज पोलिसात तक्रार दिली आहे.]

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.