Homeकोंकण - ठाणेएसटी कर्मचा-यांना महागाई भत्त्याची प्रतीक्षाच.( केंद्राचे आश्वासनच व एसटी कर्मचा-यांची निराशा.)

एसटी कर्मचा-यांना महागाई भत्त्याची प्रतीक्षाच.( केंद्राचे आश्वासनच व एसटी कर्मचा-यांची निराशा.)

एसटी कर्मचा-यांना महागाई भत्त्याची प्रतीक्षाच.
( केंद्राचे आश्वासनच व एसटी कर्मचा-यांची निराशा.)

मुंबई : – प्रतिनिधी.

राज्य शासनातील कर्मचा-यांना १ जुलैपासून महागाई भत्याचा दर ३४ टक्क्यांवरून ३८ टक्के करण्यात आला आहे तर जानेवारीच्या वेतनात संपूर्ण थकबाकीसुद्धा देण्यात आली आहे. मात्र, एसटी कर्मचा-यांच्या नशिबी फक्त निराशाच येत असल्याचा आरोप एसटी कर्मचा-यांच्या संघंटनाकडून केला जात आहे.
एसटी महामंडळातील कर्मचा-यांना फक्त ३४ टक्के महागाई भत्ता दिला जात असून, यापूर्वी सहा टप्यात वाढवण्यात आलेल्या महागाई भत्याच्या थकबाकीचीही एसटी कर्मचा-यांना प्रतीक्षाच दिसून येत आहे. एसटी महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्धापण दिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महागाई भत्ता आम्हालाच द्यावा लागणार आहे.
मात्र, अर्थखात देवेंद्र फडणविस यांच्याकडे आहे. त्यांना विचारावे लागेल, ते नाही म्हणणार नाही. असं म्हणून महागाई भत्ता देण्यास सरकार सकारात्मक असल्याचा इशारा केला. असला तरी, प्रत्यक्षात अद्याप त्यावर कोणत्याही प्रकारच्या हालचाली दिसून येत नसल्याने, अद्यापतरी एसटी कर्मचा-यांना मुख्यमंर्त्यांच्या इशारा घोषणेत बदलून त्यांची अंमलबजावणी कधी होईल याची वाटच बघावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.

थकीत महागाई भत्ता

जुलै ते सप्टेंबर २०१८ या कालावधीची २ टक्क्यांची ३ महिन्यांची थकबाकी
जानेवारी ते सप्टेंबर २०१९ या कालावधीची ३ टक्क्यांची ९ महिन्यांची थकबाकी
जुलै २०१९ ते जून २०२१ या कालावधीची ५ टक्क्याची २४ महिन्यांची थकबाकी
जुलै ते सप्टेंबर २०२१ या कालावधीची ११ टक्क्याची ३ महिन्यांची थकबाकी
ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ या कालावधीची ३ टक्क्याची ३ महिन्यांची थकबाकी
जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीची ३ टक्क्याची १० महिन्यांची थकबाकी

पण आता या महागाई भत्ता बाबत महाराष्ट्रातील एसटी कामगार कामगार संघटना आंदोलनाच्या पवित्रात आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.