Homeकोंकण - ठाणेनजर अर्जुन पुरस्कारावर ठेव, हत्तीवरून मिरवणूक काढू." - डाॅ. सुनीलकुमार लवटे. (...

नजर अर्जुन पुरस्कारावर ठेव, हत्तीवरून मिरवणूक काढू.” – डाॅ. सुनीलकुमार लवटे. ( होन्याळी ता. आजरा. गावची सुकन्या असलेली अपेक्षा हिला तिच्या क्रीडा क्षेत्रातील भरीव व श्रेष्ठत्तम योगदानाप्रीत्यर्थ महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ नुकताच जाहीर

नजर अर्जुन पुरस्कारावर ठेव, हत्तीवरून मिरवणूक काढू.” – डाॅ. सुनीलकुमार लवटे. ( होन्याळी ता. आजरा. गावची सुकन्या असलेली अपेक्षा हिला तिच्या क्रीडा क्षेत्रातील भरीव व श्रेष्ठत्तम योगदानाप्रीत्यर्थ महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला.)

आजरा. – प्रतिनिधी.

आत्ता नजर अर्जुन पुरस्कारावर ठेव, त्या वेळी हत्तीवरून मिरवणूक काढू. आणि या मिरवणुकीत मीही उपस्थित राहिन.” असे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डाॅ. सुनीलकुमार लवटे यांनी काढले. आंतरराष्ट्रीय खो-खो खेळाडू अपेक्षा सुतार हिच्या नागरी सन्मान सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. होन्याळी गावची सुकन्या असलेली अपेक्षा हिला तिच्या क्रीडा क्षेत्रातील भरीव व श्रेष्ठत्तम योगदानाप्रीत्यर्थ महाराष्ट्र शासनाचा ‘शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार’ नुकताच जाहीर झाला. या पार्श्वभूमीवर होन्याळी ग्रामस्थामार्फत भव्य नागरी सन्मान (चांदीची मूर्ती, सन्मानपत्र, रु. पन्नास हजार) व गावातून सवाद्य मिरवणुकीचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना उद्योजक शरददादा पाटील यांनी अपेक्षाच्या नेत्रदीपक योगदानाबद्दल कौतुक करीत तिला शासकीय नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून दिलीपकुमार कांबळे यांनी अपेक्षाच्या क्रीडा क्षेत्रातील कारकिर्दीसह संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला. सुनील सुतार, संतोष बिल्ले, विठ्ठल अस्वले, एम.बी. बिरंबोळे, कृष्णात पाटील आदिंनी मनोगतांतून अपेक्षाला शुभेच्छा व्यक्त करीत तिचे व तिच्या आई-वडिलांचे अभिनंदन केले. या वेळी अनिल सुतार, अनघा सुतार या अपेक्षाच्या आई-वडिलांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामस्थाविषयी कृतज्ञता व्यक्त केली. अपेक्षानेही ‘हा सन्मान कधीही विसरू शकणार नाही.’ अशी मनोगतातून कृतज्ञता व्यक्त केली. सूत्रसंचालन …. रायकर यांनी केले, तर आभार संजय पाटील यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास सरपंच स्मिता पाटील , उपसरपंच सचिन उंचावळे, संगीता देऊसकर, अश्विनी खाडे, तानाजी गुरव, जयश्री जाधव, शोभा जाधव, विजय मांडेकर, अश्विनी दिगंबर खाडे, आदिसह सर्व ग्राम पंचायत सदस्य, ग्रामसेवक देसाई मॅडम, अपेक्षाचे नातेवाईक, गावातील व परिसरातील प्रतिष्ठित, दोन्ही शाळांचे शिक्षक, विद्यार्थी व सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.