Homeकोंकण - ठाणेवारकऱ्यांच्यावरील लाठीहल्ला हा महाराष्ट्राच्या संस्कृतीवरचा हल्ला.जनवादी साहित्य संस्कृती चळवळीच्यावतीने जाहीर निषेध.( आज...

वारकऱ्यांच्यावरील लाठीहल्ला हा महाराष्ट्राच्या संस्कृतीवरचा हल्ला.जनवादी साहित्य संस्कृती चळवळीच्यावतीने जाहीर निषेध.( आज पर्यंत कधीही न घडलेली घटना शिंदे फडणीस सरकारच्या काळात वारकऱ्यांनाही सोडलं नाही. )

वारकऱ्यांच्यावरील लाठीहल्ला हा महाराष्ट्राच्या संस्कृतीवरचा हल्ला.
जनवादी साहित्य संस्कृती चळवळीच्यावतीने जाहीर निषेध.( आज पर्यंत कधीही न घडलेली घटना शिंदे फडणीस सरकारच्या काळात वारकऱ्यांनाही सोडलं नाही. )

सावंतवाडी – प्रतिनिधी.

काल आळंदी येथून निघणाऱ्या दिंडीवर पोलिसांनी केलेला लाठीहल्ला हा महाराष्ट्राच्या समतेच्या संस्कृतीवरचा हल्ला आहे, आम्ही याचा जाहीर निषेध करतो. श्री विठ्ठल हे महाराष्ट्राचे लोकदैवत असून ते समतेचे प्रतिक आहे. वारी ही जनांची संस्कृती आहे. भेदाभेद अमंगळ मानणाऱ्या वारकऱ्यांचा तो समतेचा निखळ वाहता सांस्कृतिक प्रवाह आहे. गेली अनेक शतके हा प्रवाह अखंडपणे वाहत आहे. आदिलशाही, निजामशाही ते मुघलांपासून ब्रिटीशांच्या पर्यंत अनेक राजवटी वारीने अनुभवल्या आहेत. अगदी क्रुर समजल्या जाणाऱ्या औरंगजेबाच्या कारकीर्दीतही वारीवर कधी हल्ला झाला नव्हता. पण शिंदे फडणवीस सरकारच्या काळात हा पहिल्यांदा लाठीहल्ला झाला. खरतरं गेली शेकडो वर्षे महाराष्ट्राचे समाजमन घडविण्याचे काम वारकरी चळवळीने केले आहे. विषमते विरोधात भूमिका घेत समतेचा जागर भजन, कीर्तन आणि अभंगातून केला आहे. ज्ञान देण्याला आणि घेण्याला बंदी असणाऱ्या काळात “नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी” अशी भूमिका घेत महाप्रबोधन घडविले आहे. अठरापगड कष्टकरी जातवर्गाबरोबरच अत्यंत हीन आणि अस्पर्श जातीतील व्यक्तीनाही या चळवळीने संतपद बहाल केले. इतकेच नव्हे तर जनाई सारख्या दासीला आणि कान्होपात्रा सारख्या वेशेच्या मुलीलाही आपल्या चळवळीत आदराचे स्थान दिले. संतांच्या सामाजिक क्रांतीमुळेच इथे शिवाजी राजांची राजकीय क्रांती महाराष्ट्रात अस्तित्वात आली. समतेच्या पायावर उभा असलेल्या या परंपरेला कवेत घेण्याचा डाव इथल्या विषमतावादी विचारधारेने केला. त्याला आपल्या पोटात सामावून घेत त्यात विषमतावादी मुल्ये जाणीवपूर्वक पेरण्याचा प्रयत्नही झाला पण या साऱ्याला ही समतेची परंपरा पुरून उरली म्हणूनच हा लाठीहल्ला करून हिंसेच्या मदतीने समतेचा हा प्रवाह खंडित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हा लाठीहल्ला त्याचाच एक भाग आहे. आम्ही याचा तीव्र निषेध करतो. आम्ही वारकऱ्यांचे वारसदार असून ‘भले तर देऊ गांडे लंगोटी …. पण वेळ पडल्यास नाठाळाला धडा शिकविल्या शिवाय राहणार नाही.
संपत देसाई , अंकुश कदम
अध्यक्ष सचिव जनवादी साहित्य संस्कृती चळवळ महाराष्ट्र

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.