संकेश्वर बांदा महामार्ग उत्कलन केलेल्या रस्त्याचे काम पावसापूर्वी करावे.- आजरा शिवसेनेची महामार्ग व्यवस्थापनाकडे मागणी.
आजरा. – प्रतिनिधी.
संकेश्वर ते बांदा महामार्गाच्या कामाबाबत आजरा तालुका शिवसेनेच्या वतीने आपणास निवेदन देतो की, सद्या संकेश्वर ते बांदा या महामार्गाचे काम चालु आहे. यामध्ये गडहिंग्लज ते आजरा किटवडे येथील रस्ताचे काम चालु आहे. रस्ता सगळीकडे उत्कलन करून ठेवला आहे. आजरा तालुक्यात पावसाचे प्रमाणे जास्त आहे. हा रस्ता पुढे आंबोली व गोव्याला जातो यामुळे या रस्ताने पर्यटकाची वाहतुक जास्त आहे. रस्ता उत्खलन करून ठेवल्यामुळे अनेक दुचाकी व चारचाकी यांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहेत. यामुळे या रस्ताचे पावपुर्वी संबंधित ठेकेदार व कंपनीने कोणते नियोजन करणार आहे. यासाठी आपल्या अध्यक्षतेखाली आपल्या दालनात ठेकेदार कंपनीचे अधिकारी राष्ट्रीय महामार्गाचे आधिकारी व शिवसेना पदाधिकारी यांची बैठक तात्काळ लावाली तसेच या मार्गावरील ठिकठिकाणी असलेले लहान फुले ( साकव) यांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. परंतु उत्खनन करून ओढ्यातील माती शेतकऱ्यांच्या शेतामध्ये टाकली आहे. ती माती काढून घेऊन ओढ्यातून पाणी सदर फुलाच्या खालून शेतात न जाता हे ओड्यातून जावे यासाठी तात्काळ सदर मातीचे ढिगारे काढून घ्यावे तसेच जितक्या रस्त्याचे उत्खनन केले आहे तितकाच रस्ता पावसापूर्वी करावा या पुढील खुदाई काम थांबवावे कारण पावसामध्ये पुढील रस्ता उत्खलन केल्यास ते काम होणार नाही व अपघाताला निमंत्रण द्यावे लागेल याचा विचार करून सद्यस्थितीत उत्खनन केलेल्या रस्त्याचे प्रथम काम करावे अशा असे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे प्रा. सुनिल शित्रे चंदगड विधानसभा संपर्क प्रमुख चेअरमन आजरा साखर, संभाजी पाटील उपजिल्हा प्रमुख, राजु सावंत तालुका प्रमुख, ओमकार माघाळकर शहर प्रमुख, राजु सावंत तालुका प्रमुख
युवराज पोवार आजरा तालुका प्रमुख
महेश पाटील युवा सेवा
दिलिप पाटील गट, प्रमुख,अमर कांबळे शाखा प्रमुख आदिच्या सदर निवेदनावर सह्या आहेत
