Homeकोंकण - ठाणेकोल्हापूरचा सामाजिक सलोखा टिकविण्याचे दोन्ही समाजासमोर मोठे आव्हान!.- महाराष्ट्रातील काही जबाबदार लोकप्रतिनिधी...

कोल्हापूरचा सामाजिक सलोखा टिकविण्याचे दोन्ही समाजासमोर मोठे आव्हान!.- महाराष्ट्रातील काही जबाबदार लोकप्रतिनिधी करत आहेत बेजबाबदार वक्तव्य.- कोल्हापुरातील दोन्ही समाजातील प्रमुख मंडळींनी बैठक घेऊन सामाजिक सलोखा राखण्यासाठी पाऊले उचलणे आवश्यक.राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात सामाजिक ऐक्याला सुरुंग लावणाऱ्या घटना घडणे वेदनादायी.

कोल्हापूरचा सामाजिक सलोखा टिकविण्याचे दोन्ही समाजासमोर मोठे आव्हान!.- महाराष्ट्रातील काही जबाबदार लोकप्रतिनिधी करत आहेत बेजबाबदार वक्तव्य.- कोल्हापुरातील दोन्ही समाजातील प्रमुख मंडळींनी बैठक घेऊन सामाजिक सलोखा राखण्यासाठी पाऊले उचलणे आवश्यक.
राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात सामाजिक ऐक्याला सुरुंग लावणाऱ्या घटना घडणे वेदनादायी.

कोल्हापूर ( प्रतिनिधी)

राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात सामाजिक ऐक्याला सुरुंग लावणाऱ्या घटना घडत असतील त्याच्या प्रतिक्रिया उमटत असतील तर ते कायदा आणि सुव्यवस्थेसाठी चांगले लक्षण म्हणता येणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील काही जबाबदार लोकप्रतिनिधींकडून बेजबाबदार वक्तव्य होऊ लागले आहेत. कोल्हापुरातील दोन्ही समाजातील प्रमुख मंडळींनी एकत्र येऊन बैठक घेऊन सामाजिक सलोखा राखण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत.
सामाजिक सलोख्यासाठी जातीय सलोख्यासाठी कोल्हापूर हे संपूर्ण राज्यात सुपरीचीत आहे त्याला कारण म्हणजे राजर्षी शाहू महाराज यांच्या विचाराचा वारसा. एकता, प्रेम आणि परस्परांवर विश्वास ही आपली आजची शस्त्रे असली पाहिजेत, असा मौलिक संदेश त्यांनी शंभर पेक्षाही अधिक वर्षांपूर्वी दिला होता. त्यांच्याच कोल्हापुरात त्यांच्याच विचारांना छेद देणाऱ्या घटना काही महिन्यांपासून घडत आहेत. मंगळवारी संपूर्ण राज्यात आणि देशात ३५० वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा जल्लोषाने होत असताना कोल्हापुरात एका अल्पसंख्यांक समाजातील युवकाने वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केली. त्यामुळे कोल्हापुरात मंगळवारी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. हात गाड्यांची वाहनांची मोडतोड करण्यात आली आणि प्रार्थना स्थलांवर दगडफेक करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी अहमदनगर येथील घटनेची प्रेरणा घेऊन कोल्हापुरात सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट व्हायरल केली गेली होती. शिवराज्याभिषेक दिनी हे घडल्यामुळे त्याचे दंगल सदृश्य पडसाद उमटले. कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का देणारा हा प्रकार पोलिसांनी कौशल्याने हाताळला असला तरी पोलिसांच्या विशेष शाखेचे म्हणजे एलआयबीचे हे मोठे अपयश आहे. जातीय आणि धार्मिक कलह कोणत्याही क्षणी उफाळून येऊ शकेल अशी परिस्थिती असताना या विभागाकडून कोणत्याही प्रकारची पूर्व खबरदारी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोल्हापुरात लव्ह जिहादसारखी दोन तीन प्रकरणे घडलेली आहेत गेल्या आठवड्यात असेच प्रकरण घडले आहे, त्यातच नवी दिल्लीत साक्षी हत्याकांडाचे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. नगर मधील ती क्लिप व्हायरल झाली त्याचा एकत्रित परिणाम मंगळवारच्या त्या व्हायरल पोस्टवरून अशांतता निर्माण होण्यात झाला. सामाजिक वातावरण गढूळ होण्यास त्याआधी घडलेले लव्ह जिहाद प्रकरण कारण भूत आहे.
वादग्रस्त पोस्ट व्हायरल करणारा अल्पवयीन आहे. पोलिसांनी त्याला तातडीने ताब्यात घेतले पण तोपर्यंत त्या पोस्टमुळे संपूर्ण कोल्हापूर शहरात दुपारनंतर तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले. हिंदुत्ववादी संघटना रस्त्यावर उतरल्या दोन प्रार्थना स्थळांवर तसेच एका शिक्षण संस्थेवर तुफान दगडफेक झाली. हळद विक्री त्यांच्या हात गाड्या तोडून मोडून टाकण्यात आल्या. त्यानंतर एक संतप्त जमाव लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर गेला. त्या तरुणाच्या अटकेची मागणी करण्यात आली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. पोलिसांना काही ठिकाणी लाठीमारही करावा लागला.
हिंदुत्ववादी संघटनेने बुधवारी दि. ७ जून रोजी कोल्हापूर बंदचा आदेश दिला. वास्तविक कोल्हापूर बंद आंदोलन जिल्हा प्रशासनाला तसेच पोलीस प्रशासनाला टाळता आले असते. पण आवाहन करण्या पलीकडे काही घडले नाही. दक्षता समितीच्या सदस्यांना तसेच लोकप्रतिनिधींना आणि काही सामाजिक क्षेत्रातील प्रमुख मंडळींना एकत्र बोलावून त्यांच्याकडून बंद आंदोलन मागे घेण्यासाठी प्रयत्न झाले असते तर बुधवारची हिंसक दंगल टाळता आली असती. कोणत्याही घटनेवर विना विलंब एक व्यक्त होणारे तथाकथित नेतेही मंगळवारी तसेच बुधवारी दिसली नाहीत.
राजर्षी शाहू महाराजांच्या कोल्हापुरात सामाजिक ऐक्याला सुरुंग लावणाऱ्या घटना घडत असतील त्याच्या प्रतिक्रिया उमटत असतील तर ते कायदा आणि सुव्यवस्थेसाठी चांगले लक्षण म्हणता येणार नाही. गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रातील काही जबाबदार लोकप्रतिनिधींकडून बेजबाबदार वक्तव्य होऊ लागले आहेत. कोल्हापुरातील दोन्ही समाजातील प्रमुख मंडळींनी एकत्र येऊन बैठक घेऊन सामाजिक सलोखा राखण्यासाठी पाऊले उचलली पाहिजेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.