शासनाची उदासीन भूमिकेमुळे तिलारी धरणाचे पाणी मिळण्यास अडचणी.- सुरेश गावड सरपंच. ग्रामपंचायत रोणापाल.
सह्याद्री न्यूज.प्रतिनिधी.दि.१२
【 कथा तिलारी धरणााच्याा पाण्याची… व्यथा धरणग्रस्तांची.】
तिलारी धरण हे जवळजवळ चाळीस वर्षांपूर्वी तिलारी धरणाचे काम सुरू झाले त्यानंतर कांहीं कालावधीत तिलारी धरणाच्या प्रकल्पामुळे येत असलेल्या पाण्याच्या अडचणीबाबत येथील सरपंच व नागरिकांनी आपली व्यथा प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडली आहे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की आपला रोणापाल, निगुडे, पाडलोस, मडूरा, शेर्ला, कास, सातोसे इत्यादी गावे तिलारी हरित पट्ट्यात सामील करण्यात आली आहेत . व तेंव्हापासून कोणत्याही पद्धतीत जमीन हस्तांतरण करणे, कर्ज काढणे, लागवड करणे, सहकारी संस्थांकडे काम असल्यास, बिनशेती करायची असल्यास आणि अशा प्रकारच्या अनेक कामांसाठी तिलारी कार्यालयाचा ना हरकत दाखला आवश्यक होऊ लागला. हा सारा प्रपंच फक्त आणि फक्त आपल्या परिसरात पाणी येण्यासाठी होता.परंतु केवळ संबंधित कार्यालयाची मुदतवाढ यामुळे आज पर्यंत तसाच हा प्रकल्प कागदावर आहे. त्यात कांहीही प्रगती हवी होती तशी दिसत नाही. आपला निसर्ग धर्म सांगतो काम केलं तर फळ मिळालं पाहिजे मग सुमारे चाळीस वर्षापूर्वी ज्यांनी हे योगदान दिलं त्यांची जमीन संपादन कागदपत्र केले दहा वर्षापूर्वी जमिनीचा मोबदला दिला त्यावेळच्या महसुली कायदा प्रमाणे तरीदेखील सर्व या स्थानिकांनी मान्य केलं. याच एकमेव कारण आहे फक्त आणि फक्त पाणी हा संशोधनाचा विषय आहे पाणी.पाणी आहे कुठे तिलारी धरणात, कालव्यात, पोटकाळव्यात, ठेकेदार यांच्याकडे,तीलारीच्या अधिकाऱ्यांकडे,आपल्या परिसरात पर्यंत पोहोचणाऱ्या गावांकडे की ही यंत्रणा राबविणाऱ्या शासनाकडे? या सर्व प्रश्नांचे उत्तर मिळेना म्हणून गेले चार महिने तिलारी पाटबंधारे कार्यालय चाराठे सावंतवाडी याना आपल्याकडे बोलावून विचारणा केली.साधारण चार महिन्यापूर्वी सांगण्यात आले पाणी लवकरात लवकर येणार.तेही मान्य केलं पण प्रगती दिसली नाही म्हणून काम थांबवलं यानंतर पुन्हा आले लवकरात लवकर येईल सांगितले मान्य केले मग कंटाळून पुन्हा काम थांबवले त्यावेळी माझ्या रोणापाल गावापुरते लेखी तारीख घालून लिहून दिले.हे असे का करतात म्हणून आम्ही स्थानिकांनी रोणापाल गावापासून ओतवने गावापर्यंत कालव्याची पाहणी केली.काम खूपच अपुरे म्हणून आम्ही रोणापाल मधून मी,मदुर्यातून प्रकाश वालावलकर,सातोसेतून अरुण पंडित,निरगुडे तून समीर गावडे,इंसुळीतून महेश धुरी,ओतवणेतून रवींद्र म्हापसेकर असे. व इतर सर्व तिलारी कार्यालय चराठे येथे गेलो प्रभारी अधिकारी यांनी उपअभियंता,कनिष्ठ अभियंता आणि इतर याना बोलावून चर्चा केली आणि १५ ते २० मे पर्यंत पाणी रोणापाल गावात येणार असे तोंडी सांगितले आणि दोन दिवसांनी तसे लेखी पत्र देतो म्हणून सांगितले.आज ११ मे ही तारीख उजाडली तरीही लेखी पत्र दिले नाही किंवा पाणी जवळपास दिसत नाही. ही पेंशन योजना आहे का? बापाच्या कारकिर्दीत सुरू होणार आणि मुलाना मिळणार हे समजत नाही.याबाबतीत गांभीर्याने विचार करून आपल्या मीडिया स्तरावर योग्य ती कार्यवाही व्हावी.
【 यामधील प्रमुख गोष्ट अशी आहे की महाराष्ट्र शासनाने गोवा शासाणाबरोबर करार करून ही योजना सुरू केली ती तिलारी पाटबंधारे या विभागातील नोकरांसाठी, तिलारी पाटबंधारे विभागाच्या ठेकेदार यांच्यासाठी की नक्कीच जमीन दिलेल्या आणि इतर शेतकरी लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी हे कळत नाही म्हणून गंभीर आरोप आहे की तिलारी पाटबंधारे कार्यालय यांच्याकडून आजा नव्हे तर गेली तीन दशके चाललेला कारभार हा केवळ आणि केवळ ठेकेदारांकडून मिळणाऱ्या ताक्केवारिसाठी चाललेला आहे.याच उत्तम उदाहरण आहे पोटकालावे.पोटकाळव्याच काम सुरू करण्यासाठी हे तिलारी पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी आग्रही आहेत अगदी सर्व माहीत आहे मुख्य कालव्याला अद्याप पाणी नाही.】
आम्ही काम करू देणार नाही हे माहीत असून सुद्धा पोटकाळव्याच्या कामाला अट्टाहास असेल तर मुख्य कालव्याचे काम का पुढे सरकत नाही?
थोडक्यात यामध्ये पारदर्शक कारभार नसल्याचे दिसत आहे. हे निश्चित पण २५ मे पर्यंत पाणी रोणापाल पर्यंत न आल्यास पूर्वसूचना न देता जे काही निर्णय घेऊ आणि या वेळी कायदा व सुव्यवस्थेचाा प्रश्न त्यास प्रशासन जबाबदार राहील.आमची कुठलीही जबाबदारी रहाणार नाही. असे सुरेश गावड सरपंच ग्रामपंचायत रोणापाल.यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.