(महाराष्ट्र शासनपर्यटन संचलनालय पुणे यांचे मान्यता प्राप्त.)
पाटील रिसॉर्ट,- कला कृषी पर्यटन केंद्र उद्घाटन समारंभ. संपन्न.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील आंबोली रोड हाळोली फाटा नजीक महाराष्ट्र शासनपर्यटन संचलनालय पुणे यांचे मान्यता प्राप्त पाटील रिसॉर्ट, कला कृषी पर्यटन केंद्र उद्घाटन समारंभ रविवार दि २१ मे २०२३ रोजी संपन्न झाला. अध्यक्षस्थानी खास. संजय मंडलीक होते. तर प्रमुख पाहुणे आम. प्रकाश अबिटकर होते. स्वागत व प्रास्ताविक पाटील रिसॉर्ट चे मालक इजि. विजयकुमार पाटील यांनी केले. दीपप्रज्वलाने कार्यक्रमाची सुरुवात झाली यावेळी
अध्यक्षस्थानावरून बोलताना खास. श्री मंडलिक म्हणाले निसर्ग रम्य परिसरात १० एकर मध्ये हिरव्यागार एक हजार काजू आंबा सह इतर वृक्ष या वृक्षांच्या सानिध्यात पर्यटकांसाठी आनंददायी, शांतता व चांगल्या पद्धतीच्या सोयी उपयुक्त असे हे रिसॉर्ट काळाची गरज होती. हा आंबोली – गोवा होत असलेला राष्ट्रीय महामार्ग असून या मार्गावरून देश विदेशातील पर्यटक जात असतात या पर्यटकांना या पाटील रिसॉर्टचा फायदा होणार आहे. वृक्षांची जतन करत असे वेगवेगळे व्यवसाय होणे गरजेचे आहे कला कृषी पर्यटन केंद्र म्हणून भविष्यात नक्कीच नावारूपाला येईल असे श्री खास. मंडलिक बोलताना म्हणाले
यावेळी बोलताना आम. श्री. आबिटकर म्हणाले पर्यटकांना साध देणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गावर अशा एका रिसॉर्टची गरज होती. परंतु निसर्गाच्या सानिध्यात व निसर्गरम्य वातावरणात पाटील रिसॉर्ट एक अगंळ – वेगळं आहे. भविष्यात नावारूपाला येणार असल्याचे आम. श्री. आबिटकर म्हणाले.

पाटील रिसॉर्ट व पाटील परिवाराच्या वतीने सर्व पाहुण्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. यावेळीमा.राज्य मंत्री भरमु आण्णा पाटील, नियोजन मंडळाचे सदस्य अशोकआण्णा चराटी, सावंत गुरुजी यांनी आपल्या मनोगत आतून पाटील रिसॉर्ट साठी शुभेच्छा दिल्या यावेळी मा. जि.प. उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, आजरा बँक चेअरमन डॉ. अनिल देशपांडे, मुकुंददादा देसाई चेअरमन जनता बैंक, माजी. सभापती उदयराज पवार, कारखाना संचालक दशरथ अमृते, मुरगुडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, मा. नगराध्यक्षा.श्रीमती ज्योत्स्ना चराटी सौ.राजश्री पाटील, श्रीमती वंदना अविनाश पाटील, कु. अजिंक्य पाटील, सरपंच संघटनेचे राजु पोतणीस, मराठा महासंघाचे मारुती मोरे ,आजऱ्याचे सर्व नगरसेवक आजरा तालुक्यातील सरपंच, विविध संघटनेचे पदाधिकारी ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आभार कु. तनूजा पाटील यांनी मांनले.

