महापालिका निवडणुका ऑक्टोबरमध्ये – उपमुख्यमंत्री फडणवीस.
पुणे.- प्रतिनिधी.
महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जुलै महिन्यामध्ये सुनावणी होणार
आहे. त्याचा ऑगस्टमध्ये निकाल येऊन साधारण ऑक्टोबरमध्ये निवडणुका होतील,
असा अंदाज आहे. लोकसभेच्या आणि
विधानसभेच्या निवडणुका एकत्रित न होता
ठरलेल्या वेळीच होतील असे उपमुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. महापालिकेच्या वतीने बालेवाडी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, राज्य सरकारने पुण्याला ११०० कोटीचा निधी दिलेला आहे. त्यात कात्रज-कोंढवा रस्त्यासाठी २०० कोटी रुपये दिले आहेत. त्यामुळे कात्रज कोंढवा रस्त्यासाठी आता पैशाची कमतरता नाही. बारामती लोकसभा मतदारसंघावर पत्रकारांचं जास्त लक्ष असतं आम्हाला आम्ही पूर्ण ४८ लोकसभा मतदारसंघावर लक्ष देत आहोत. केंद्रीय नेत्यांचे सातत्याने सर्व लोकसभा मतदार संघाचे दौरे करत आहेत. त्यापैकी एक बारामती लोकसभा आहे. जिल्हा विभागाच्या अनेक मागणी आमच्यापुढे आहेत. त्यामुळे एखाद्या जिल्ह्याचा विचार करता येणार नाही. सर्व जिल्ह्यांचा एकच विचार करावा लागेल असे फडणवीस म्हणाले…
