मुंबईचे माजी महापौर
विश्वनाथ महाडिक यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन.- सेनेने गमाविला कट्टर
शिवसैनिक – तर उद्धव ठाकरे यांना अखेरपर्यंत दिली साथ.
भावपूर्ण श्रध्दांजली
मुंबई :-प्रतिनिधी.
मुंबई महापालिकेचे
माजी महापौर विश्वनाथ महाडिक यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन वयाच्या 63
व्या
वर्षी निधन झाले. कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती.
लग्नाच्या वाढदिवशीच
त्यांचा मृत्यू झाला आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांनी शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून
काम केले होते. तसेच ते स्थायी समितीचे सदस्य होते. 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात
शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव झाला होता. सेनेच्या माजी आमदार
तृप्ती सावंत यांची बंडखोरी त्यांच्या पराभवास कारणीभूत ठरल्या होत्या.
शिंदे गटाने दिली होती
अप्रत्यक्ष ऑफर:-
मुंबईचे माजी महापौर
विश्वनाथ महाडेश्वर हे 22 मार्च रोजी सायंकाळी विधानभवनात
पोहोचले. त्या ठिकाणी शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी महाडेश्वर यांच्या
हातात हात जाऊन मिळविला. महाडेश्वर यांच्या उजव्या हातावर एक छोटी पांढरी रंगाची
पट्टी चिटकवली होती. त्याविषयी गोगावले यांनी विचारणा केली. तेव्हा महाडेश्वर
यांनी रक्ताची चाचणी केल्याचे सांगितले. ही संधी न दवडता भरत गोगावले यांनी
विश्वनाथ महाडिक यांनी शिंदे गटात येण्याची ऑफर केली.
उद्धव ठाकरे यांना
अखेरपर्यंत साथ:-
भरत गोगावले म्हणाले,
की
आमच्याकडे या. तुमचा रक्तदाब व मधुमेह हे आजारपण निघून जाईल. आम्ही कसे ठणठणीत
आहोत, हे
पाहा. ते ऐकून विश्वनाथ महाडिक यांनादेखील हसू आवरले नाही. उद्धव ठाकरे
यांच्यासोबत असलेल्या आमदारांना व कार्यकर्त्यांना अनेक अग्निपरीक्षांना सामोरे
जावे लागत आहे. अशात ही अग्नी परीक्षा नको असेल तर आमच्यासोबत या, असेच गोगावले यांनी त्यांना सुचवले.
याचाच अर्थ शिंदे गटासोबत आल्यावर तुम्हाला कुठलाही त्रास राहणार नाही, असे त्यांनी म्हटले होते. मात्र,
विश्वनाथ
महाडिक यांनी अखेरपर्यंत उद्धव ठाकरे यांची साथ दिली.
विश्वनाथ महाडिक यांची
अशी राहिली कारकीर्द
2002 – बृहन्मुंबई
महानगरपालिकेतील नगरसेवक म्हणून निवड
2003 – बृहन्मुंबई
महानगरपालिकेच्या शिक्षण समितीचे अध्यक्ष म्हणून निवड
2007 / 2012 – बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये नगरसेवक म्हणून निवडून
आले.
2017 – बृहन्मुंबई
महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड.
