Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रबुरुडे - भावेश्वरी कॉलनी नागरिकांचे :- रस्ते, गटर्स, विज नसलेबाबत.. तहसीलदार निवेदन....

बुरुडे – भावेश्वरी कॉलनी नागरिकांचे :- रस्ते, गटर्स, विज नसलेबाबत.. तहसीलदार निवेदन. ( त्यावेळेचे सदस्य व सरपंच यांनी सदर जागा मालकांकडुन आर्थिक देवाणघेवाण करुन त्यांचेकडुन रस्ते किंवा ओपण स्पेस हस्तांतरण करुन घेतलेले नाहीत. )

बुरुडे – भावेश्वरी कॉलनी नागरिकांचे :- रस्ते, गटर्स, विज नसलेबाबत.. तहसीलदार निवेदन. ( त्यावेळेचे सदस्य व सरपंच यांनी सदर जागा मालकांकडुन आर्थिक देवाणघेवाण करुन त्यांचेकडुन रस्ते किंवा ओपण स्पेस हस्तांतरण करुन घेतलेले नाहीत. )

आजरा,- प्रतिनिधी

आजरा बुरुडे येथील नविन वसलेल्या भावेश्वरी कॉलनी मधील गट क्रमांक अनुक्रमे ३ व १३४, १३९, १३६ असे असुन सदर गट नंबर मध्ये निवासी रहीवासाकरीता (NA) ऑर्डर्स आपल्या कडुन घेऊन प्लॉट तयार करून संबंधीत मालकांनी विक्री केली परंतु आपल्या कडुन एन ए ऑर्डर्स घेऊन आपण दिलेल्या आदेशाप्रमाणे संबंधीत जागा मालकांनी तेथील गटर्स, रस्ते, विज पुरवठा केलेला नाही आहे. आपल्या आदेशाला झुगारुन संबंधीत जागा मालकांनी अशा कोणत्याही सेवासुविधा न देता सदरील प्लॉट नागरीकांना फसवणुक करुन विकले आहेत. सद्या आप – आपल्या खरेदी प्लॉट मध्ये नागरीकांनी गरजेपोटी घरे बांधली आहेत. परंतु सदर घरांचे सांडपाणी किंवा ये जा करणेसाठी रस्ते किंवा लाईट्स याची कोणत्याही प्रकारच्या सोई सुविधा दिल्या नाही. आहेत सांडपाण्यामुळे भविष्यात आरोग्याचा प्रश्न उध्दभवु शकतो तरी आपण सदर जागेची प्रत्यक्ष पाहणी करुन आम्हा रहीवास्यांना न्याय मिळवून द्यावा. तसेच सदर जागा मालकांना आपला जरब बसावा या करीता योग्य ती कार्यवाही त्यांच्यावर करावी अन्यथा सदरचे जागा मालक हे अश्या अनेक गोर गरीब नागरीकांना नाहक त्रास देतच राहतील व आपल्या कायद्यास धजवणार नाहीत. तसेच इसमेंट राईट आहे. मानवी वस्तीत गटर्स, पाणी व विज देणे तरी आम्हाला न्याय मिळावा तसेच बुरुडे ग्रामपंचायत मधील त्यावेळेचे सदस्य व सरपंच यांनी सदर जागा मालकांकडुन आर्थिक देवाणघेवाण करुन त्यांचेकडुन रस्ते किंवा ओपण स्पेस हस्तांतरण करुन घेतलेले नाहीत किंवा घेतले असले तरी आपल्या आदेशानुसार कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता ताब्यात घेतले आहेत. त्याचा नाहक त्रास नागरीकांना होत आहे. तरी सदर प्रकरणातील सर्व गोष्टींचा सहानभुतीपुर्वक विचार करुन आम्हाला न्याय मिळावा अशा आशयाचे निवेदन देण्यात आले आहे या निवेदनावर विहाल फुल्ला, महेक मकानदार, मनकर मुल्ला, आदम बकर, शाफिर बक्कर, नामदेव घेवडे,सकार करमळकर, विनायक ओतारी, हानमंत जादूनवर, मोहन गावडा, मंगल धोरपडे, सागर गिरी, संजय कुंभार
सविता गावडा, माधुरी गिरी, नंदा गिरी,लखण पाटील, तानाजी सोनुले
विकास पाटील, आकाश चव्हाण,
अनिल कोबले, प्रितम कोस्कर सह नागरिकांच्या सह्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.