ह. भ. प. चोरगे विद्यालय, बेलेवाडी हु शाळेस महिंद्रा फायनान्स व गर्जना प्रतिष्ठान कडून स्वछतागृह प्रदान .
आजरा.- प्रतिनिधी.

महिंद्रा फायनान्स कंपनीच्या सी. एस. आर. निधीतून व गर्जना प्रतिष्ठान च्या सहकार्यातून कोल्हापूर जिल्ह्यातील पूर बाधित शाळांचे नूतनीकरण प्रकल्पा अंतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांच्या साठी 1 , शिक्षकांसाठी 1 व विद्यार्थिनीसाठी 4 स्वछतागृहे बांधून देण्यात आली आहेत. गर्जना प्रतिष्ठान चे संस्थापक मा प्रकाश दादा बेलवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्याचे उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच शाळेसाठी ब्लॅक बोर्फ, टेबल, खुर्च्या, फॅन, ट्युबलाईट , संगणक टेबल इ आवश्यक साहित्य ही प्रदान करण्यात आले .
प्रकाश बेलवाडे हे संघर्षातून तयार झालेले नेतृत्व आहे. त्यांच्याकडून तालुक्याचा विकास होऊ शकतो -नाथाजी पाटील
आमच्या वेळी जो संघर्ष करावा लागला तो संघर्ष पुढच्या पिढीला करावा लागू नये यासाठी गर्जना प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करत आहोत-प्रकाश बेलवाडे

यावेळी नाथजी पाटील-भाजपा कोल्हापूर जिला संघटन मंत्री , प्रकाश बेलवाडे- संस्थापक गर्जना प्रतिष्ठान , बिपीन भस्मे- सांगली जिल्हा एरिया मॅनेजर,अमित मिरजकर – कोल्हापूर एरिया मॅनेजर, शाम गावडे-महिंद्रा फायनान्स, दिगंबर मिसाळ-अध्यक्ष गर्जना प्रतिष्ठान , संतोष बेलवाडे-सचिव गर्जना प्रतिष्ठान , जगदीश बापु पाटी- चेअरमन चोरगे विद्यालय, महादेव रामाने- ग्रा प सदस्य, मीनाक्षी सुतार-ग्रा प सदस्य , विनायक शिंत्रे, विठ्ठल मुदाळकर , जोतिबा नाडवडेकर , बाळासाहेब धामणकर, शाळेचे मुख्यध्यपक बी जी सोळंकुरे सर इतर पालक, शिक्षक, इतर स्टाफ आदी मान्यवर उपस्थित होते.
