Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा रायवाडा दरोड्यातील एक आरोपी ताब्यात.

आजरा रायवाडा दरोड्यातील एक आरोपी ताब्यात.

आजरा रायवाडा दरोड्यातील एक आरोपी ताब्यात.

आजरा.- प्रतिनिधी.

रायवाड्यात दि.१२ रोजी पहाटे पडलेल्या दरोड्याचा तपास युध्द पातळीवर करत अवघ्या कांही तासात आरोपीच्या मुसक्या आजरा पोलीसांनी आवळल्या आहेत.
रात्री प्रल्हाद गुरव यांच्या शेतातील दरोडा पडला होता.यामध्ये २२० वराह जनावरांसह सोने, चांदी, काजूगर व रोख रक्कम असा मुद्देमाल जोरात गेला होता.या घटनास्थळी श्वानपथक पाचारण करण्यात आले होते मात्र त्याचा उपयोग झाला नाही. हा दरोडा पोलिसांसमोर आव्हान होते.
पोलीसांनी तातडीने सुत्र हालवत तपास सुरु केला.शेवटी बेळगाव येथील रुक्मिणीनगर येथे राहणाऱ्या रवी नाईक या संशयिताला ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्हा कबूल ही केला आहे. त्याच्या सोबतीला आणखीन सहाजण असल्याचे समजते. पोलीस त्यांचाही शोध घेत आहे. या तपासात गुन्हे अन्वेषण, चंदगड, नेसरी पोलीसांचे सहकार्य मिळाले आहे .पुढील तपास आजरा सहा.पोलीस निरीक्षक सुनिल हारुगडे करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.