Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा रायवाड्यात पहाटे दरोडा.- ९ लाख १७ हजाराचा मुद्देमाल लंपास.- १५ आरोपी...

आजरा रायवाड्यात पहाटे दरोडा.- ९ लाख १७ हजाराचा मुद्देमाल लंपास.- १५ आरोपी फरार.-श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले

आजरा रायवाड्यात पहाटे दरोडा.- ९ लाख १७ हजाराचा मुद्देमाल लंपास.- १५ आरोपी फरार.-
श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा तालुक्यातील रायवाडा येथे सुमारे १५ दरोडेखोरांनी बुधवारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास धुमाकूळ घालत नग्या तलवारींसह हत्यारांचा धाक दाखवत प्रल्हाद गुरव व त्यांच्या कुटुंबीयांना बांधून घालून वराह पालन युनिटवर कब्जा मिळवला. दीडशेवर डुकरे, काजू प्रक्रिया उद्योगातील काजूगर घरातील दागदागिने असा ९ लाख १७ हजाराचा मुद्देमाल लंपास केला.
या भयंकर दरोड्याने गुरव कुटुंबीसह परिसरातील रहिवाशी हादरले आहेत. चोरट्यांचा माग शोधण्यासाठी पोलीस यंत्रणाही सक्रीय झाली आहे. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की बुधवारी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास कन्नड व मराठी भाषा बोलणाऱ्या सुमारे १५ दरोडेखोरांनी प्रल्हाद गुरव यांच्या रायवाडा येथील वराह पालन युनिट व काजू प्रक्रिया युनिटसह घरामध्ये प्रवेश केला. घरामध्ये असणाऱ्या प्रल्हाद गुरव यांच्यासह त्यांची पत्नी सौ. पूनम गुरव व राजेश गुरव यांना मारहाण करून बांधून घालून वराह पालन युनिटमधील सुमारे १५० लहान मोठी डुक्करे, दीडशे किलो काजूगर व त्यांच्या तिजोरीतील दाग-दागिने व रोकड लंपास केली.

आयशर गाडीतून आलेल्या या दरोडेखोरांनी सुमारे तासभर धुमाकूळ घातला. यावेळी गुरव कुटुंबीयांकडील मोबाईलही त्यांनी काढून घेतले होते कर्नाटक भागातील असल्याचा संशय केला जात आहे. याबाबतची फिर्याद पूनम गुरव यांनी दिली असून अधिक तपास आजरा पोलीस करत आहेत.

चौकट.

मालमत्ता वर्ग. दागिने/आभूषण
इतर चांदीचे दागिने.
नाणे आणि चारन, भारतीय रुपया
इतर कृषि उत्पादनेइतर
कच्चा माल, चांदीचा कमर पटटा
४८,०००/- रूपये त्यात चांदीचे ताट, निरंजन हळदी कुंकवाचे दोन करंडे, वाटया दोन, पैंजण जोड
२५०००/ रूपये त्यात रोख रक्कम ५००, २००, १००,५० रूपये दराच्या भारतीय चलनी नोटा मिळून कि. सदर. १३,००,०००/- रूपये त्यात लहान व मोठे पांढरे वराह (डुक्कर) अंदाजे २२० मिळून किमंत सदर १,६२,०००/- रुपये त्यात काजू फक्टरीतील तयार काजूगर माल अंदाजे २५० किलो मिळून किमंत सदर. ६०,०००/- रूपये त्यात काजू फक्टरीतील कच्या काजू बी |अंदाजे ५०० किलो मिळून किमंत सदर.
एकूण मुल्य (रू. मध्ये)
९ लाख १७ हजार

दागिने आभूषन, (मालमत्ता प्रकार)

सोन्याचे मंगळसूत्र

सोन्याचे गळ्यातील हार
२५०००,/- रूपये त्यात फिर्यादीची पत्नी पूनम यांचे
गळ्यातील अर्धा तोळ्याचे
गळ्यातील कपाटात ठेवलेले
अंदाजे अडीच तोळे वजन १,१०,०००/रुपये त्यात फिर्यादीची पत्नी पूनम यांचे

गळ्यातील कपाटात ठेवलेला

अडीच तोळे वजनाचा सोनू २५,००० रुपये त्यात फिर्यादीची पत्नी पूनम यांचे
कानातील कपाटात ठेवलेले अर्धा
तोळे वजनाचे सोन् २५,०००/- रुपये त्यात अर्धा तोळे वजनाची सोन्याची एक अंगठी व

दोन सोन्याचे मणी मिळून जुवा सह अन्य

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.