आजरा. – प्रतिनिधी.

देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी जी यांच्या हर घर जल उद्दिष्टानुसार जल जीवन मिशन या महत्वाकांक्षी योजने अंतर्गत मौजे- वडकशिवाले येथे आंबेओहळ ओढ्यावर असलेल्या जुन्या जॅकवेल ची दुरुस्ती, मोटर, वीज घर, सोलर सिस्टिम , जॅकवेल ते पाण्याच्या टाकीपर्यंत मुख्य पाईप लाईन व गावंतर्गत वितरण लाईन अशा कामांसाठी मा. सरपंच संतोष बेलवाडे यांच्या पुढाकारातून ऑक्टोबर 2022 मध्ये रु 66 लाखाची योजना मंजूर झाली. या योजनेचा भूमिपूजन समारंभ या योजनेसाठी पाठपुरावा करणारे वडकशिवाले गावचे विकास पुरुष म्हणून ज्यांना ओळखले जाते असे प्रकाश दादा बेलवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 10 एप्रिल रोजी करणेत आले.
यावेळी प्रकाश बेलवाडे, माजी सरपंच संतोष बेलवाडे, ग्रा. प. सदस्या शिलाताई बेलवाडे, बळवंत कदम, शंकर कदम, मारुती संकपाळ, सुनील खराडे, विष्णू कदम, मोहन दळवी, माजी उपसरपंच संजय शिंदे, माजी उपसरपंच बाबुराव कांबळे, दिनकर कसलकर, दत्तात्रय खराडे, मनोहर गोविलकर, राहुल कांबळे, नेताजी बेलवाडे, बाजीराव लोखंडे, आकाश कदम, सागर कांबळे, बबन खराडे, विलास गोविलकर, बाळाराम सोनार इत्यादींसह गावातील नागरिक, बचत गट व ग्रामसंघाच्या सर्व महिला उपस्थित होत्या.
(योजनेविषयी थोडक्यात माहिती )
स्थानिक आमदार/ माजी मंत्र्यांनी डावलल , यादीतून काम काढून टाकल तरीही आम्ही मंजूर करून घेऊन दाखवलं.
पंतप्रधान मा नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना हर घर जल अंतर्गत जल जीवन मिशन योजनेंतर्गत मौजे वडकशिवाले गावासाठी 66.72 लाख रुपयांची योजना मंजूर करून घेतली.
प्रथम फेब्रुवारी 2022 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात या योजनेसाठी मी प्रस्ताव दिला होता तो रिजेक्ट केला गेला. पुन्हा जून मध्ये नवीन शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात नव्याने प्रस्ताव देण्यात आला. भर पावसातून पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या योजनेसाठी सर्वे केला . सुरुवातीला 36 लाख रुपयांचा एकूण प्रस्ताव तयार केला होता पण सोलर बसवण्याची योजना व पाईप लाईन साठी खराब होणाऱ्या रस्त्याच्या दुरुस्तीचा खर्च पकडून सुधारित 66.72 लाखाचा प्रस्ताव केला तो मंजूर ही करून घेतला.
