आजरा मडिलगेत अत्यावश्यक रिंग रोडच्या कामचा प्रारंभ.- अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी.
आजरा.- प्रतिनिधी.

मडिलगे येथे गावातील दळणवळणासाठी रिंग रोडची मागणी अनेक वर्षापासून पुढे येत होती. यासाठी भावेश्वरी देवीच्या यात्रेच्या निमित्ताने हा रिंग रोड मार्ग करण्यासाठी ग्रामस्थांनी सहकार्य केल्यामुळे हा रिंग रोड करण्याचा शुभारंभ दि. ११ रोजी संपन्न झाला. गावाच्या भोवतीने व
लोकसहभाग तसेच ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून होत असून या रिंग रोड मुळे अनेक गावातून येणाऱ्या वाहनांच्या अडचणी व शेतकऱ्यांच्यासाठी उपयुक्त असा हा मार्ग तयार होणार आहे. यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित पडलेला प्रश्न ग्रामपंचायत च्या माध्यमातून मार्गी लागला आहे.

या कामाचा शुभारंभ माजी सभापती भिकाजी गुरव, माजी उपसभापती दीपक देसाई, शेतकरी धोंडीबा पोवार, गाव पाटील रवींद्र पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष निवृत्ती पाटील देवस्थान समिती अध्यक्ष विश्वजीत मुंज माजी सरपंच पांडुरंग मुंज, सुरेश हसबे तसेच ग्रामपंचायत आजी-माजी सदस्य, ग्रामपंचायत विद्यमान सदस्या, सौ.कानेकर, सौ मुरुकटे यांच्या शुभहस्ते व ग्रामस्थांच्या उपस्थितीत रिंग रोड चा शुभारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाची प्रास्ताविक उपसरपंच सुशांत गुरव यांनी केले तर उपस्थित त्यांचे आभार लोकनियुक्त सरपंच बापू निऊगरे यांनी मानले

