Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रआजरा बस स्थानकाचा प्रतीकात्मक होणार उद्घाटन सोहळा.- लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्षामुळे हस्तांतर...

आजरा बस स्थानकाचा प्रतीकात्मक होणार उद्घाटन सोहळा.- लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्षामुळे हस्तांतर व उद्घाटनाकडे दुर्लक्ष. – सत्ताधाऱ्यांचा श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न.- युवराज पोवार.

आजरा बस स्थानकाचा प्रतीकात्मक होणार उद्घाटन सोहळा.- लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्षामुळे हस्तांतर व उद्घाटनाकडे दुर्लक्ष. – श्रेयवाद घेण्याचा प्रयत्न.- युवराज पोवार.

आजरा.- प्रतिनिधी.

आजरा बस स्थानकाचा प्रतीकात्मक होणार उद्घाटन सोहळा गुरुवार दि. ६ रोजी १२ वा. लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे दुर्लक्षामुळे हस्तांतर व उद्घाटनाकडे दुर्लक्ष प्रलंबित राहिल्यामुळे सदर बस स्थानकाचे उद्घाटन करणार असल्याची पत्रकार परिषदेत माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार यांनी दिली. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना श्री पोवार म्हणाले आजरा मधील तालुक्यातील जनतेसाठी असणारे बस स्थानक म्हणजे आजरा शिवसेनेच्या आंदोलनाचे यश आहे. १९७२ चार पत्रा गाळे मध्ये बस स्थानक होते त्यावर सिमेंटचे पत्रे होते या ठिकाणी छप्पर गळती घाणीचे साम्राज्य प्रचंड झाले होते. हा प्रश्न घेऊन शिवसेनेच्या वतीने संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली २०१३ साली आजरा बस स्थानक येथे पहिले आंदोलन झाले. यानंतर जिल्हाप्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील पदाधिकारी यांच्या समावेत परिवहन विभाग कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात आले यानंतर २०१४ साली राज्यात सत्ता बदल होऊन शिवसेनेचे दिवाकर रावते परिवहन मूर्ती झाले तालुक्यातील सर्व पदाधिकारी व जिल्हाप्रमुख विजय देवने यांच्यासह मुंबई मंत्रालय येथे भेट घेऊन बस स्थानकाची परिस्थिती सांगून व याची दखल घेत परिवहन माजी मंत्री श्री रावते यांनी परिवहन विभागाला सूचना देऊन 75 लाख रुपये निधीची तरतूद केली व सदर पत्र मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालय यांना पाठवण्यात आले. व ३/३/२०१८ भूमिपूजन सोहळा पार पडला यानंतर बस स्थानकाचे काम होऊन आज दोन वर्षे झाली तरी बस स्थानक आजरा आगार कडे हस्तांतर न केल्यामुळे या ठिकाणी परिसरामध्ये पाळीव प्राण्यांचा वावर वाढत आहे उन्हाळ तरुण मंडळी अनुचित प्रकार करत आहेत काही प्रकार घडत आहेत यामुळे या बस स्थानकाचा प्रतीकात्मक उद्घाटन सोहळा आम्ही जिल्हाप्रमुख विजय देवणे, उपसंघटक संभाजी पाटील, चंदगड सह संपर्कप्रमुख सुनील शिंत्रे, तालुकाप्रमुख युवराज पोवार, राजेंद्र सावंत यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी शिवसैनिक यांना सोबत घेऊन उद्घाटन सोहळा करत आहोत असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. या पत्रकार परिषदेत उपसंघटक संभाजी पाटील उप तालुका प्रमुख जयसिंग पाटील युवा सेनेचे महेश पाटील शहर प्रमुख ओमकार माधाळकर विभाग प्रमुख दिनेश कांबळे सह पदाधिकारी उपस्थित होते.

बस स्थानक घटनाक्रम.- सेवा सुविधा

कोल्हापूर विभागामधील आजरा येथे रा.प. महामंडळाने सन १९७२ मध्ये प्रवाशी गाळे असलेने बसस्थानक बांधण्यात आले. सदरचे बसस्थानका जून्या पध्दतीचे बस स्थानक आजरा हे कोकणात जाण्याकरीता कर्नाटक राज्य राज्य यांना जोडणारे शहर असल्यामुळे अत्याधुनिक बसस्थानक आहे.
मा प्रादेशिक व्यवस्थापकला. प. पुणे यांनी त्यांचे परिपत्र २८५०२५/५/२०१४ नुसार
आजरा येथे अत्याधुनिक पध्दती १३५०२०” मापाचे १२ गाळे असलेले स्वच्छतागृहाचा डांबरीकरण

कामासतः अंतर्भाव असलेले ७५.०० लक्ष रक्कमेचे अंदाजपत्रक मंजूरी करिता माखा स्थापत्य

अभियंता मध्यवर्ती कार्यालय, मुंबई यांचेकडे सादर केलेले आहे.
वरील कामाचा महाराष्ट्र शासनाकडून शासनाच्या सर्वसाधारण योजना २०१४-१५ मध्ये समावेश कर याबाबत मा.मुख्य स्थापत्य अभियंताप मध्यवर्ती कार्यालय, मुंबई यांचे पत्र क्र. स्था/कामे/२७०२ दि.२५/१/२०१३ नुसार कळविले आहे. सदर कामास मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रशासकीय मंजूरी तांत्रिक मंजूरी माढी करणेत येत आहे.
नविन प्रस्ताविव बसस्थानकासाठी प्रस्तावित असलेल्या कामाचा तपशील
बसस्थानक फलाट
अ. वाहतूक नियंत्रण कर १२
ब. उपहारगृह
आरक्षण कक्ष
१) महिला कर्मचारी विश्रांतीगृह
चालक वाहक विश्रांतीगृह
४) स्वच्छतागृह
वाहनतळ डांबरीकरण
वरील कामांचा अंतर्भाव प्रस्तावित केलेला असून कामास रु.७५.०० लक्ष खर्च अपेक्षीत आहे.
विभाग नियंत्रक,
राज्य परिवहन, कोल्हापूर. अशी तरतूद बस स्थानकात करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.