आजरा अर्बन बँकेचा एकूण व्यवसाय १३२५ कोटी नफा.
आजरा.- प्रतिनिधी.
नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षामध्ये आजरा बँकेने रु. १६५ कोटी इतकी व्यवसायामध्ये वाढ केली असून एकूण व्यवसाय रु. १३२५ कोटी इतका झाला आहे. याच बरोबरीने निव्वळ एनपीएचे प्रमाण हे शून्य टक्के राखण्यात यश मिळवले आहे. या आर्थिक वर्षात बँकेस सर्व आवश्यक तरतुदी करून एकूण १० कोटी ८१ लाख इतका नफा झाला आहे. मागील वर्षी जिल्ह्यामधील सर्वोत्कृष्ट बैंक हा पुरस्कार मिळवल्यानंतर याही वर्षी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यामध्ये सातत्य राखण्याचे काम हे बँकेचे हितचिंतक, सभासद, ठेवीदार, कर्जदार यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच हे शक्य झाले अशी माहिती बँकेचे चेअरमन डॉ. अनिल देशपांडे यांनी दिली. याच बरोबरीने बँकेच्या या यशामध्ये सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी अविरत काम केल्यामुळेच बँकेची प्रगती होऊ शकते असे मत बँकेचे उपाध्यक्ष श्री. रमेश कुरुणकर यांनी व्यक्त केले.
सातत्याने विविध नवीन योजना आपल्या सभासद आणि ग्राहकांच्या विकासासाठी आणणे याला संचालक मंडळाने प्राधान्यक्रम दिला आहे. मागील वर्षी केंद्र आणी राज्य शासनाच्या विविध अनुदानाच्या योजना बँकेने राबविल्या आहेत. नुकतेच सूक्ष्म, लघु आणि माध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने खादी आणि ग्रामोद्योग आयोगामार्फत चालविल्या जाणाऱ्या “पंतप्रधान रोजगार निर्मिती योजनेच्या अंमलबजावणीसाठी आजरा बँकेचा समावेश झाला आहे. या योजनेचा लाभ घेऊन ग्रामीण भागात रोजगार
निर्मितीचा उपक्रम बँकेमार्फत करण्याचा मानस अण्णा भाऊ संस्था समूह प्रमुख अशोक चराटी यांनी व्यक्त केला. ग्रामीण भागातील तरुणाना व्यवसायासाठी तयार करणे आणि त्यासाठी आवश्यक असणारे प्रशिक्षण देखील बँकेच्या माध्यमातून देण्याचा संकल्प ज्येष्ठ संचालक सुरेश डांग,. विलास नाईक,. प्रकाश वाटवे, डॉ. दीपक सातोसकर, किशोर भुसारी,. बसवराज महाळक, . मारुती मोरे, . आनंदा फडके, सौ. प्रणिता केसरकर, श्रीमती शैला टोपले, सौ. अस्मिता सबनिस, सुनिल मगदूम, . सुर्यकांत भोईटे, किरण पाटील, . संजय चव्हाण, अॅड. सचिन इंजल, मनोहर कावेरी, जयवंत खराडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रशांत गंभीर यांनी केला आहे.
