सकल मराठा समाजाचे आजरा .- तहसीलदारांना निवेदन.
【आमदार,खासदार यांना सळो कि पळो करून सोडण्यास वेळ लागणार नाही. – जिल्हाध्यक्ष मारुती मोरे. 】
आजरा. प्रतिनिधी.दि.१०
आजरा येथील सकल मराठा समाज यांच्या वतीने आजरा तहसीलदार विकास आहिर यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यामुळे महाराष्ट्रातील मराठा समाजातील नागरिकांमध्ये खदखद व असंतोष पसरला आहे. मराठा समाजाच्या दृष्टीने ५ मे काळा दिवस ठरला आहे.
मराठा समाज संवेदनशील व शांततेच्या, व लोकशाहीच्या मार्गाने लढा देत लाखोचे ५२ मोर्चे काढले या मोर्चाचे संपूर्ण भारतात कौतुक करण्यात आले. यामुळे मराठा समाज आता आरक्षणामध्ये खच्चीकरण झाल्यामुळे मराठा समाजातील युवक उद्रेक करण्याच्या मनस्थितीत पोहोचत आहे. परंतु कोरोणाच्या पार्श्वभूमीवर मराठा युवकांना संयम राखण्याचे आवाहन केले आहे. मराठा समाजात असंतोषचा बांध घालणे कठीण झाले आहे. यासाठी मराठा समाजाला आरक्षण देऊन आमच्या मागण्या मान्य कराव्या या मागण्या मध्ये
मराठा समाजाला घटनात्मक रित्या टिकणारे आरक्षण द्यावे. अन्यथा मराठा समाजातील नागरिक आमदार आणि खासदार यांना सळो कि पळो करून ठेवल्या शिवाय शांत बसणार नाही.
यासाठी राज्य सरकारने व केंद्र सरकारने तसा ठराव करून घटना दुरुस्ती करावी.
राजश्री शाहू महाराज संशोधन शिक्षण प्रशिक्षण व मानव सारथी ही संस्था मराठा समाजाच्या प्रगती पाया ठरणारी आहे.
यासाठी या संस्थेचा विस्तार व्हावा.
तसेच सारथी यार संस्थेची उपकेंद्र महाराष्ट्रात ठिकाणी व्हावी.
या केंद्रामध्ये महाराष्ट्रातील तज्ञ नागरिकांची संचालक म्हणून जबाबदारी द्यावी., या संस्थेसाठी दोन हजार कोटीचा निधी उपलब्ध करावा. अशा सोळा मागण्या दिलेल्या निवेदनात सकल मराठा समाजाने केल्या आहेत. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, सरचिटणीस, तालुका अध्यक्ष, व कार्याध्यक्ष यांच्या सह्या आहेत.
सकल मराठा समाजाचे आजरा .- तहसीलदारांना निवेदन. 【आमदार,खासदार यांना सळो कि पळो करून सोडण्यास वेळ लागणार नाही. – जिल्हाध्यक्ष मारुती मोरे. 】
RELATED ARTICLES