पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजना. – कोट्यधीश होण्याचा..हा तो पर्याय आहे.
पहा..तर काय आहे योजना.
नवी दिल्ली : वृतसंस्था.
कोट्यधीश व्हावे ही प्रत्येकाचीच इच्छा असते. शिवाय जोखीम न घेता कोट्यवधी रुपये कमावता आले तर त्याच्या सारखा आनंद नाही. म्हणजेच तुमच्या पैशांना धोकाही नाही आणि तुम्ही मालामाल व्हाल. यासाठी एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. पोस्ट ऑफिसच्या अल्पबचत योजना हा तो पर्याय आहे. यामध्ये जोखीम फारच कमी आणि परतावा भरघोस आहे.
पोस्ट ऑफिसची अल्पबचत योजना तुम्हाला खरोखरच कोट्यधीश बनवू शकते. (How to become Crorepati) या योजनेत तुम्ही एकरकमीदेखील गुंतवणूक करू शकता आणि छोटी गुंतवणूक नियमितपणे देखील करू शकता.
नियमित गुंतवणुकीने मोठी रक्कम बनवा
दीर्घकालीन छोट्या गुंतवणुकीने मोठी रक्कम उभी करता येते.
यासाठी फायनान्शियल प्लॅनरची मदत घ्यावी. जर स्वत:च आर्थिक नियोजन आखायचे असेल तर त्यासाठी थोडासा अभ्यास आवश्यक आहे.
अल्पबचत योजना (Small Saving scheme)
अल्पबचत योजनेतून मोठी रक्कम कशी उभी राहते ते पाहूया. पीपीएफ म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (Public Provident Fund)ही एक उत्तम योजना आहे. या योजनेद्वारे छोटीशी नियमित गुंतवणूक करून तुम्ही कोट्यधीश होऊ शकता.
पीपीएफवर मिळते ७.१ टक्के व्याज
पीपीएफवर सध्या सरकार ७.१ टक्के व्याज देते आहे. पीपीएफ खाते १५ वर्षांनी मॅच्युअर्ड होते. मात्र तुम्ही याची मुदत ५ – ५ वर्षांसाठी वाढवू शकता.
महागाईचा परिणाम नाही
पीपीएफ अंतर्गत ३ प्रकारे करबचत होते. गुंतवणूक केल्यावर डिडक्शनचा फायदा मिळतो, दुसरा व्याजावर कोणताही कर लागत नाही आणि तिसरा मॅच्युरिटीला मिळणारी रक्कमदेखील करमुक्त असते. या गुंतवणुकीवर महागाईचा परिणाम होत नाही कारण या योजनेवर ७.१ टक्के व्याज मिळते आणि कोणताही कर लागत नाही. त्यामुळे महागाईदरापेक्षा जास्त परतावा मिळतो.
३०० रुपयांची दररोज गुंतवणूक
पीपीएफमध्ये तुम्ही जर ३०० रुपयांची दररोज गुंतवणूक केलीत तर १५ वर्षांनंतर मॅच्युरिटीच्या वेळेस ७.१ टक्के व्याजदरानुसार तुम्हाला २९ लाख २९ हजार १११ रुपये मिळतील. ही योजना १५ वर्षांनी मॅच्युअर्ड होते, मात्र या योजनेला दर ५ वर्षांनी मुदतवाढ देता येते. या पद्धतीने तुम्ही याची मुदत ५ वर्षांनी वाढवली तर तुम्हाला मॅच्युरिटीला १,११,२४,६५६ रुपये मिळतील.
पीपीएफमध्ये एका वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. यात प्राप्तिकर अधिनियमाच्या कलम ८० सी अंतर्गत करवजावटदेखील मिळते. यामुळे तुमचा कर देखील वाचतो. शिवाय पीपीएफवरील व्याजदेखील करमुक्त आहे आणि मॅच्युरिटीला मिळणारी सर्व रक्कमदेखील करमुक्त आहे.
५ तारखेपर्यत जमा करा पैसे
पीपीएफमध्ये दिले जाणारे व्याज हे ५ तारखेला तुमच्या पीपीएफ खात्यात असणाऱ्या रकमेवर दिले जाते. यासाठी ५ तारखेपर्यत तुमचे पैसे जमा करा. जर यात एक दिवस जरी उशीर झाला तरी २५ दिवसांचे व्याज तुम्हाला मिळणार नाही.