आम. हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसा निमित्त महाविकास आघाडी वतीने रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा तालुका महाविकास आघाडी यांच्या वतीने माजी ग्रामविकास मंत्री आम. हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये दि.३०/३/२०२३ रोजी स्थळ पं.दिनदयाल हायस्कूल महागाव रोड, आजरा.सायं.५.०० वा. भव्य रस्सीखेच स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तरी इच्छूक स्पर्धकांनी या स्पर्धेत बहुसंख्येने सहभाग घ्यावा. यासाठी प्रवेश की नाही असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बक्षीसे.- पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक १५००१/- रु.
राष्ट्रवादी काँग्रेस आजरा तालुका कडून द्वितीय क्रमांक १०००१/- रु.
श्रीमती अंजनाताई रेडेकर संचालिका गोकुळ दूध संघ यांचे कडून
तृतीय क्रमांक ५००१/- रु. संभाजी पाटील (नगरसेवक नगरपंचायत आजरा) यांचेकडून, चतुर्थ क्रमांक ५००१ अबूसाहेब तकीललदार संचालक आजरा खरेदी विक्री संघ
उत्कृष्ट संघ २००१/- रु. प्रा. सुनिल शिंत्रे (चेअरमन आजरा साखर कारखाना यांचेकडू व
सर्व विजेत्या संघांना शिल्ड
नियम व अटी
१) स्पर्धा ही, ओपन असेल
२) प्रत्येक संघात ७ खेळाडू राहतील
३) एका खेळाडूला एकच संघातून खेळता येईल
४) दुखापत झालेस आयोजक जबाबदार राहणार नाही.
५) इतर नियम व अटी स्पर्धेच्या ठिकाणी सांगण्यात येतील
६) पंचांचा निर्णय अंतीम राहील.
या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रवादी कॉग्रेस आजरा तालुका, राष्ट्रीय कॉग्रेस आजरा तालुका शिवसेना (बाळासाहेब ठाकरे ), जयशिवराय तरुण मंडळ आजरा यांनी केले आहे.
