Homeकोंकण - ठाणेमाहीममधील 'अति'क्रमण हटाव,'त्या' मजारीवर अखेर हातोडा;राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर करण्यात करण्यात आली कारवाई-...

माहीममधील ‘अति’क्रमण हटाव,’त्या’ मजारीवर अखेर हातोडा;राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर करण्यात करण्यात आली कारवाई- राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीम दर्ग्यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांचे महत्वाचे आदेश.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ह्यांना विनंती आहे की,हे अनधिकृत बांधकाम तोडा. अन्यथा तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू.जे होईल ते होईल,असा इशारा राज ठाकरे यांनी बुधवारी दिला होता.

माहीममधील ‘अति’क्रमण हटाव,
‘त्या’ मजारीवर अखेर हातोडा;
राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर करण्यात करण्यात आली कारवाई- राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर माहीम दर्ग्यासंदर्भात मुंबई पोलीस आयुक्तांचे महत्वाचे आदेश.- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ह्यांना विनंती आहे की,हे अनधिकृत बांधकाम तोडा. अन्यथा तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू.जे होईल ते होईल,असा इशारा राज ठाकरे यांनी बुधवारी दिला होता.

मुंबई :- प्रतिनिधी.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कवरील रॅलीतून माहीमच्या खाडीत अनधिकृत मजार बांधल्याचा दावा केला होता.तसेच ही मजार महिन्याभरात न हटवल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही राज ठाकरे यांनी दिला होता. राज ठाकरे यांच्या इशाऱ्याला 24 तास उलटत नाही तोच मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने अखेर हे अतिक्रमण हटवले आहे. खाडीतील मजारच्या जागेवरील हिरवा झेंडा हटवण्यात आला आहे. तसेच अनधिकृत मजारवर जेसीबी मशीन फिरवण्यात आली आहे. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

👉राज ठाकरे यांनी काल इशारा दिल्यानंतर कालच पोलिसांनी संबंधित मजारवर जाऊन पाहणी केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनीही तात्काळ ते अनधिकृत बांधकाम हटवण्याचे आदेश दिले होते. हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी सात जणांचं पथक तयार करण्यात आलं होतं. आज सकाळी 8 वाजता पोलीस, जिल्हाधिकारी प्रशासन आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन ही कारवाई केली. कारवाई करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

👉अर्ध्या तासात मजार तोडली

यावेळी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जेसीबी मशीनच्या सहाय्याने अनधिकृत मजार जमीनदोस्त करण्यात आली. सर्वात आधी या मजारीवरील झेंडा हटवण्यात आला. त्यानंतर तोडक कारवाई करण्यात आली. अवघ्या अर्ध्या तासात ही संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणी पुन्हा बांधकाम होऊ नये म्हणून पोलीस आणि पालिकेचा वॉच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, तोडक कारवाईवेळी कोणताही अडथळा आला नाही. कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

👉राज ठाकरे काय म्हणाले होते?

राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्क मैदानावर सभा घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांनी समुद्रात मजार बांधली गेल्याचा दावा केला होता. त्यांनी ड्रोनद्वारे व्हिडीओही दाखवला होता. तसेच पोलिसांना मजारवर कारवाई करण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली होती. एक महिन्यात कारवाई केली नाही तर आम्हीही त्याबाजूला गणपतीचं मोठं मंदिर बांधू असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यामुळे प्रशासनाचे धाबे दणाणले होते. राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर अवघ्या 24 तासात मजारवर कारवाई करण्यात आली आहे.

👉ही जागा 600 वर्षं जुनी, विश्वस्तांचा दावा

माहीम समुद्रातील कथित मजारीचं मॅपिंग करण्यात आलं आहे. महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डाचे अधिकारी माहीम समुद्रातील ठिकाणावर पोहोचले आहेत. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मॅरिटाईम बोर्डाला जाग आल्याचे बोलले जात आहे. माहीमच्या वादग्रस्त मजारीच्या ठिकाणी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल झालं आहे. तसेच एक जेसीबी देखील त्या ठिकाणी तयार ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, माहीम समुद्रामधील या ठिकाणावर माहीम दर्गा ट्रस्टनं मोठा दावा केला आहे. ही जागा 600 वर्षं जुनी आहे. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणं ती आताच बांधलेली नाही. मुळात, हजरत मकदूम अली शाह हे याच जागी बसून हजरत ख्वाजा खिजर अली शाह यांच्याकडून शिक्षण घ्यायचे. ही ऐतिहासिक जागा आहे. तिथं दर्गा उभारण्याचा आमचा कुठलाही विचार नाही, असं माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांनी सांगितलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.