Homeमुंबईबुगटे आलूर - श्री नृसिंह गुरुदत्त देवाची यात्रा विविध कार्यक्रमाने होणार संपन्न.

बुगटे आलूर – श्री नृसिंह गुरुदत्त देवाची यात्रा विविध कार्यक्रमाने होणार संपन्न.

बुगटे आलूर – श्री नृसिंह गुरुदत्त देवाची यात्रा विविध कार्यक्रमाने होणार संपन्न.

हुक्केरी.- प्रतिनिधी.

हुक्केरी तालुक्यातील बुगटे आलूर येथील सालाबाद प्रमाणे श्री नृसिंह गुरुदत्त देवाची यात्रा कार्यक्रम राजू अलुरकर, जी. व्ही. आलूरकर ट्रान्सपोर्ट कोल्हापूर यांच्या सौजन्याने रविवार दि.२६ रोजी श्री नृसिंह गुरुदत्त देवाची भव्य यात्रा व या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमाची आयोजन करण्यात आले आहे. या यामध्ये बैलगाडी शर्यत, टांगा शर्यत, घोडा गाडी शर्यत, सिंगल घोडा शर्यत, तसेच नामवंत पैलवानांच्या मोफत निकाली जंगी कुस्त्या, या विविध स्पर्धेमध्ये विजेत्यांना उत्कृष्ट बक्षिसांचे आयोजन केले आहे. व खासकरून कोल्हापूर यांचा बहारदार व्हरायटी शो व नाटक वारसा व आर्केस्ट्रा सप्तसूर पंचक्रोशीतील व ग्रामस्थांच्या प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या विविध कार्यक्रम व यात्रेनिमित्त व्यवस्थापक मैदान व्यवस्था व स्वागत हनुमान तालीम मंडळ, इतर व्यवस्था शिवशक्ती, त्रिमूर्ती, भगवा रक्षक, छावा ग्रुप, युवा स्टार, महेश नलावडे युवा मंच, बालाजी कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, भीमगर्जना युवक मंडळ यांचे सहकार्य लाभले आहे. या यात्रेनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमास गावातील अनेक दानशूर नागरिकांनी व्यापारी वर्ग तसेच मंडळ सदस्यांनी देणगी देऊन सहकार्य केले आहे.
तरी या यात्रेनिमित्त येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सहर्ष स्वागत करत यात्रा व्यवस्थित व सुरळीत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन यात्रा कमिटीचे अध्यक्ष विनोद पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य सर्व यात्रा कमिटी सदस्य ग्रामस्थ यांनी केले आहे.
【 या विविध स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या स्पर्धकांनी आपली नावे व्यवस्थापन मंडळाकडे नोंदवावी असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे. 】

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.