जिल्हा बँकेच्या सर्व शाखेमध्ये गरजूंना बँकिंग व्यवहारातील स्थानिक बँक कर्मचाऱ्यांनी मोफत सेवा द्यावी.- प्रकाश बेलवाडे.
( मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा बँक कोल्हापूर यांना निवेदन. )
कोल्हापूर.- प्रतिनिधी.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजे कोल्हापूर जिल्हातील कृषी सहकारी संस्थाची शिखर बँक आहे. गेल्या काही वर्षांमध्ये विविध कारणामुळे शेतकऱ्यांची बँक बदनाम होत आहे मागील कर्जमाफी मध्ये ४०० कोटी रुपये आले असताना त्यातील बहुतेक सर्व शेतकऱ्यांचे आपल्या बँकेत वरून आदेश आहे असे बँकेचे कर्मचारी यांनी सांगून खातेदारांना रुपये पाच हजार ते दहा हजार रुपये एफडी करणे भाग पाडून त्यानंतर गरीब लाचार बळीराजाला उर्वरित रुपये चाळीस हजार काढण्याची मुभा मिळाली या अत्याचारा विरोधात व बँकेच्या सर्व शाखेमध्ये अशिक्षित गरजूंना बँकिंग व्यवहारात स्थानिक बँक कर्मचाऱ्यांनी स्लिप भरून देण्यासाठी खाजगी एजंट कडून दहा रुपये रक्कम ही बेकायदेशीर घेतली जात आहे. व ही १० रु रक्कम घेण्यात येऊ नये. याबाबत सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बेलवाडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांना निवेदनाने मागणी केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. की कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शाखा मध्ये स्थानिक पातळीवर दलांची नियुक्ती झाल्याची दिसते निरक्षर अथवा वयाने अधिक झालेल्या अथवा इतर शारीरिक मर्यादेने वास्तव लिहिता वाचता न येणाऱ्या शेतकऱ्यांना अथवा सभासदांना कोणताही व्यवहार करण्यासाठी जी काही आवश्यक स्लिप अथवा पत्र व्यवहार करावा लागतो त्यामध्ये बँकेचे कर्मचारी अथवा अधिकारी यांनी सहकार्य करणे अपेक्षित असताना आपण शाखेच्या दरवाजात अथवा आत मध्ये एक बाहेरील दलाल नियुक्त केला आहे. एखाद्या शेतकऱ्याला शंभर रु जरी काढायचे असतील तरी त्या व्यक्तीला दहा रुपये द्यावे लागतात. मगच स्लिप भरून मिळते सदर दिवसभरात किमान १०० गरीब शेतकऱ्याकडून दहा रुपये प्रमाणे अंदाज एक हजार रुपये मिळवतो म्हणजे उकळतो आपल्या १९१ शाखा मधून दोन लाख रुपये भ्रष्टाचार होत आहे. असे हे अनेक महिने सुरू आहे मासिक रुपये ५० लाखाचा भ्रष्टाचार आणि गरीब शेतकऱ्यांची लूट आपण आजच थांबून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून द्यावी. तसेच शेतकऱ्यांच्या अधिकाऱ्यांची माहितीपत्रक सुद्धा सर्व शाखेमध्ये दर्शनीय ठिकाणी प्रदर्शित करावे व ज्या शेतकऱ्यांना समजत नसेल अशा शेतकऱ्यांना आपण स्वतः स्लिप भरून देणे ही जबाबदारी येथील कर्मचाऱ्यांची आहे. व सद्या होत असलेले लूट थांबावी याबाबत सभासदांच्या आणि बँकेच्या हितासाठी आपण नक्कीच त्वरित आणि कारवाई कराल अशा आशयाचे निवेदन श्री बेलवाडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा बँक यांना दिले आहे.
