Homeमुंबईसह्याद्री लाईव्ह युट्युब व पोर्टल चैनल महाराष्ट्राचा.- सह्याद्री भूषण २०२३ गुणगौरव सोहळा...

सह्याद्री लाईव्ह युट्युब व पोर्टल चैनल महाराष्ट्राचा.- सह्याद्री भूषण २०२३ गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.

सह्याद्री लाईव्ह युट्युब व पोर्टल चैनल महाराष्ट्राचा.- सह्याद्री भूषण २०२३ गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न.

गडहिंग्लज.- प्रतिनिधी.

सह्याद्री लाईव्ह, पोर्टल व यूट्यूब चैनल महाराष्ट्र व सह्याद्री सोशल फाउंडेशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज कोल्हापूर जिल्ह्यात गडहिग्लज तालुक्यामध्ये गडहिंग्लज नगर परिषद येथे सह्याद्री भूषण राज्यस्तरीय गुणगौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आबिटकर होते. स्वागत व प्रास्ताविक संपादक संभाजी जाधव यांनी केले.
यावेळी राज्यातील नामवंत शिक्षक, डॉक्टर. वनपाल, पोलीस पाटील, बचत गट, सामाजिक कार्यकर्ते यांना राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय, पुरस्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. या सोहळ्यात राधानगरी भुदरगड आजरा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार प्रकाश आबिटकर अध्यक्ष स्थानावरून बोलताना म्हणाले सह्याद्री लाईव्ह चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी होणारा हा पुरस्कार वितरण सोहळा समाजाला उमेद देणार आहे. आज या ठिकाणी ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचे काम खरोखरच कौतुकास्पद आहे. आपल्या सर्वांना भावी वाटचालीस शुभेच्छा व सह्याद्री लाईव्ह या सर्वप्रथम असेच कार्यक्रम घेऊन समाजामध्ये चांगले काम करणाऱ्या लोकांचे कौतुक करण्यासाठी भविष्यकाळात चांगले यश मिळावं असे श्री.आम. आबिटकर म्हणाले.
यावेळी यंत्रमाग महामंडळाचे माजी अध्यक्ष पुंडलिकभाऊ जाधव म्हणाले समाजातील काही अशा घटकांना आपण पुरस्कार देऊन सन्मानित केला त्यांचे काम इतके महान असून त्यांच्या कार्याचा गौरव फारसा कमीच होतो असे काही यातील पुरस्कर्ते आहेत त्यांना आपण सन्मानित केला सह्याद्री लाईव्ह युट्युब वर पोर्टल चैनल या माध्यमातून हा पुरस्कार सालाबाद प्रमाणे होत आहे यामध्ये शैक्षणिक सामाजिक कला क्रीडा संस्कृती गडकोट अशी काही आपण विविध पुरस्कर्ते जे निवडले आहात त्यांचे काम पाहिले असता उल्लेखनीय कार्य आहे अशा घटकांचा आम्ही आदर करतो यासाठी असेच आपण नेहमी कार्यक्रम घेऊन आपले चॅनेल महाराष्ट्रात नाहीतर देशात पोहोचावे यासाठी आमच्याकडून शुभेच्छा असे श्री जाधव म्हणाले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून
जी प सदस्य जिवमदादा पाटील, गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर, नियोजन मंडळाचे सदस्य अशोकअण्णा चराठी , मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले आदी प्रमुख मान्यवरांचा उपस्थित हा सोहळा पार पडला.
यावेळी सर्वांनी सह्याद्री सोशल फाउंडेशन व सह्याद्री लाईव्ह चैनल महाराष्ट्रचे भरभरून कौतुक केले. असंच आपलं प्रेम सह्याद्री लाईव्ह चैनल वर महाराष्ट्रातील जनतेने पोहचावे व हीच आमची मनःपूर्वक अपेक्षा. यावेळी मुख्य संपादक व संस्थापक सह्याद्री सोशल फाउंडेशन महाराष्ट्र नितीन बोटे, संपादक संभाजी जाधव, कार्यकारी संपादक धनाजी देसाई , कोकण विभाग प्रमुख विनोद जाधव, कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र यादव , यांच्यासह
नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन दयानंद भंडारी व इंद्रायणी सुतार यांनी केले.
आभार कार्यकारी संपादक धनाजी देसाई यांनी मानले

राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त पुरस्कर्ते.-

प्रा.डॉ.निशांत चंद्रकांत निर्मळे यांना आदर्श शिक्षकरत्न पुरस्कार
कृष्णात शामराव डेळेकर यांना आदर्श वनपाल पुरस्कार
संजय शामराव पाटील याना आदर्श शिक्षक पुरस्कार
मुकुंद बाबुराव कुंभार यांना आदर्श पोलीस पाटील पुरस्कार
कृष्णा अंतराम दावणे यांना राज्यस्तरीय आदर्श कलारत्न पुरस्कार

जिल्हास्तरीय पुरष्कार विजेते

प्रवीण पांडुरंग परीट यांना आदर्श तलाठी पुरस्कार
संदीप शिवाजी चौगले यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार
डॉ.मिलिंद मनोहर कदम यांना आदर्श आरोग्यदूत पुरस्कार
शैलेंद्र काशीनाथ उळेगड्डी यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार
कु ईशा सलीम देसाई यांना आदर्श शिक्षक/ सामाजिक पुरस्कार
सचिन आबासो सटाले यांना आदर्श उधोगरत्न पुरस्कार
प्रतिभा लक्ष्मण पाटील यांना आदर्श वनरक्षक पुरस्कार
सुमैय्या अमित खेडेकर यांना आदर्श नगरसेविका पुरस्कार
रिटा शाल्वादोर रॉड्रीग्युस यांना आदर्श कुलभूषण पुरस्कार
तानाजी मारुती पाटील यांना आदर्श कलाशिक्षक पुरस्कार
राजेंद्र यशवंत पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
अवधूत हिंदुराव पाटील यांना आदर्श सामाजिक/गडसंवर्धन पुरस्कार
संस्कृतील महिला ग्रामसंघ व महिला बचत गट यांना आदर्श महिला ग्राम संघ पुरस्कार
बाजीराव मारुती मोरे यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार
अश्विनी विनोद जाधव यांना आदर्श समाजरत्न पुरस्कार
संदेश पांडुरंग भोपळे यांना आदर्श सरपंच पुरस्कार

तालुकास्तरीय पुरष्कार विजेते.-
आनंदा कृष्णा घाटगे यांना आदर्श कृषिभूषण पुरस्कार
महादेव संभाजी दिवेकर यांना आदर्श सरपंच पुरस्कार
रुपाली स्वप्नील शिंदे यांना आदर्श महिला नवोदित लेखिका पुरस्कार
प्रकाश आनंदा डेळेकर यांना आदर्श अकॅडमी शिक्षक पुरस्कार
रणजित गजानन पाटील यांना आदर्श वनरक्षक पुरस्कार
सोनल दीपक हरमळकर यांना आदर्श आरोग्य सेविका पुरस्कार
शरद ज्ञानदेव देवेकर यांना शेतीमित्र पुरस्कार.
वरील पुरस्कार पुरस्कर्त्यांना मानपत्र, शिल्ड, शाल, पुष्पगुच्छ मान्यवरांच्या उपस्थित देऊन गौरवण्यात आले. सहयाद्री Live महाराष्ट्र यांच्या वतीने सर्व पुरष्कार विजेत्यांचे अभिनंदन भावी वाटचालीस शुभेच्छा.

पुरस्कार वितरण सोहळ्यात जिल्हास्तरीय ग्रामसंघ पुरस्कार प्राप्त संस्कृती महिला ग्रामसंघ व बचत गट देवकांडगाव येथील महिलाचा वनअमृत प्रोजेक्ट स्टॉल लावण्यात आला होता मान्यवर पाहुण्यांच्या कडून सदर प्रोजेक्ट राबवणाऱ्या महिलांचे स्वागत करण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.