HomeUncategorizedआजपासून त्वरीत गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग :-तर कमर्शिअल सिलिंडरच्या दरात 350...

आजपासून त्वरीत गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग :-तर कमर्शिअल सिलिंडरच्या दरात 350 रुपयांनी वाढ, देवाची आरतीही झाली महाग.- आता सांगा कसे करावे सण साजरे, दोन वर्षांत घरगुती गॅस सिलेंडरचे भाव वाढले गगनाला ( 1 मार्चपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. दिल्लीत याची किंमत 1103 रुपयांवर गेली आहे.)होळीपूर्वी सामान्य जनतेसाठी हा मोठा धक्का आहे.

आजपासून त्वरीत गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग :-
तर कमर्शिअल सिलिंडरच्या दरात 350 रुपयांनी वाढ, देवाची आरतीही झाली महाग.- आता सांगा कसे करावे सण साजरे, दोन वर्षांत घरगुती गॅस सिलेंडरचे भाव वाढले गगनाला ( 1 मार्चपासून 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 50 रुपयांनी वाढली आहे. दिल्लीत याची किंमत 1103 रुपयांवर गेली आहे.)
होळीपूर्वी सामान्य जनतेसाठी हा मोठा धक्का आहे.

नवी दिल्ली :- वृत्तसंस्था

केंद्र सरकार महागाईच्या आघाडीवर सपशेल फेल ठरल्याचे चित्र आहे. महागाईने होरपळणाऱ्या जनेतला कुठलाच दिलासा मिळत नसल्याचे त्यांच्यात प्रचंड रोष आहे.खाद्यान्न आणि खाद्यपदार्थ, अन्नधान्य अगोदरच महाग झाले आहे. आता कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत पुन्हा वाढ केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जोरदार झटका बसला आहे. पेट्रोल-डिझेलचे भाव अगोदरच गगनाला भिडलेले आहेत. त्यात जीएसटीमुळे दैनंदिन वापरातील वस्तूंचे भावही वाढले आहेत. खाद्यतेलाबाबतच तो काय थोडाफार दिलासा मिळत आहे. बाकी सर्वच वस्तूंच्या किंमती दोन वर्षांत झपाट्याने वाढल्या आहेत. एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350 रुपयांची वाढ झाली. सिलेंडरची किंमत 1103 रुपयांपर्यंत पोहचली आहे. या 1 मार्चपासून ही दरवाढ लागू होईल.

मोदी सरकारच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात घरगुती एलपीजी गॅसच्या किंमती सूसाट आहेत. 400 रुपयांच्या आतबाहेर मिळणारे सिलिंडर आज हजार रुपयांच्या पुढे गेले आहे. यामध्ये जवळपास दुप्पटीपेक्षा जास्त वाढ झाली आहे. पण गेल्या वर्षी 6 जुलै 2022 रोजी पासून किंमतीत मोठी वाढ झालेली नाही. आता सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. व्यावसायिक गॅसच्या किंमतीत सरत्या वर्षात 4 वेळा बदल झाला. चार वेळा गॅस सिलेंडरमध्ये दरवाढ झाली. एकूण 153.50 रुपयांची दरवाढ झाली.

एप्रिल 2021 पासून आतापर्यंत गॅस सिलेंडरच्या किंमतीत 284 रुपयांची वाढ झालेली आहे. एप्रिल 2021 मध्ये गॅस सिलेंडर 809 रुपयांत विक्री होत होते. त्यानंतर आतापर्यंत यामध्ये 9 वेळा दरवाढ करण्यात आली आहे. वर्ष 2021 मध्ये गॅस सिलेंडरच्या किंमतीत 205.5 रुपयांची वाढ झाली. तर 2022 मध्ये 153.5 रुपयांनी किंमती वाढल्या. यावर्षात, 2023 मध्ये पहिल्यांदा एलपीजी सिलेंडरच्या किंमती 50 रुपयांनी वाढल्या आहेत. या दरवाढीमुळे राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमती 1103 रुपयांपर्यंत पोहचल्या आहेत.

व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीत 350 रुपयांची वाढ झाली. कमर्शियल गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याने रेस्टॉरंट, हॉटेल, धाबे आदीवरील जेवण महागले. गॅस दरवाढीमुळे जेवणाचा बेरंग होण्याची शक्यता आहे. दरवाढीचा फटका ग्राहकांना बसणार आहे. त्यामुळे आता हॉटेलमधील जेवण महागणार आहे. त्यासाठी ग्राहकाला अधिकचा खर्च करावा लागणार आहे.

1 एप्रिल 2021 मध्ये गॅस सिलेंडरच्या किंमती 809 रुपये होत्या

२) 1 एप्रिल 2022 मध्ये गॅस सिलेंडर 949.5 रुपयांना मिळत होते

3) जुलै 2022 मध्ये एलपीजीची किंमत 1045 रुपयांवर पोहचली

मार्च 2023 एलपीजीची किंमत 1103 रुपयांवर पोहचली

आता तुम्हाला काशी विश्वनाथ मंदिरात बाबांची आरती करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त रुपये मोजावे लागणार आहेत.

वाराणसीतील काशी विश्वनाथ मंदिरात बाबांची आरती महाग झाली आहे. मंगला आरतीसाठी भाविकांना आणखी 150 रुपये मोजावे लागणार आहेत. म्हणजेच आता 350 ऐवजी 500 रुपये मोजावे लागणार आहेत. त्याचबरोबर सप्तऋषी आरती, शृंगार भोग आरती आणि मध्यान्ह भोग आरतीच्या तिकिटांमध्ये 120 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या आरतींसाठी 180 ऐवजी 300 रुपये मोजावे लागणार आहेत. यापूर्वी 2018 मध्ये म्हणजेच 5 वर्षांपूर्वी मंगला आरतीच्या तिकिटात 100 रुपयांची वाढ करण्यात आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.