आजरा मडिलगे आठवडा बाजार प्रारंभ.- परिसरातील गावातील ग्रामस्थांनी लाभ घ्यावा. – बाजार समिती, ग्रामपंचायतचे आवाहन.
आजरा.- प्रतिनिधी.

आजरा मडिलगे येथे भावेश्वरी बाजार समिती व ग्रामपंचायत मडिलगे यांच्या संयुक्त विद्यमानाने बुधवार रोजी आठवडा बाजार भरण्यास सुरवात झाली. यावेळी बाजार मैदानावर माजी सरपंच दिपक देसाई यांच्या हस्ते वजन काट्याची पूजा केली. तर ग्रामदैवत भावेश्वरी देवीला बाजार समिती अध्यक्ष संभाजी जाधव यांच्या वतीने श्रीफळ देऊन बाजार भरवण्याची सुरुवात करण्यात आली या शुभारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच बापू निऊगरे होते. स्वागत उपसरपंच सुशांत गुरव यांनी केले यावेळी बाजारात आलेल्या विविध व्यापाऱ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी बाजार समिती उपाध्यक्ष सचिन ह कातकर, सचिव – किशोर हारळकर, उपसरपंच सुशांत गुरव, माजी सरपंच के.व्हि. येसणे, गणपतराव आरळगुळकर, ग्रामसेवक प्रताप पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष निवृत्ती पाटील, यात्रा कमिटी अध्यक्ष प्रकाश कडगावकर यांच्या हस्ते व्यापाऱ्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सुनील निऊगरे, विश्वास भाईगडे, पाडुरंग कुरळे, औदुत येसणे, वसंत घाटगे, गंगाराम आयवाळे, सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार सचिव हारळकर यांनी मानले.

【 आज दि. १ रोजी बुधवार पहिला आठवडा बाजार असून यानंतर प्रत्येक बुधवारी बाजार भरत असल्यामुळे फक्त बुधवार रोजी फेरीवाले भाजी विक्रेते व अन्य विक्रेत्यांनी गावात विक्रीसाठी येण्याचे आहे. इतर कोणत्याही वारादिवशी आल्यास सदर विक्रेत्यास दंड आकारण्यात येणार आहे. यामुळे फक्त बुधवार रोजी बाजार दिवशीच व्यापाऱ्यांना व्यापार करण्यासाठी मडिलगे गावामध्ये संधी देण्यात येत आहे. यामध्ये संकष्टी एकादशी दिवशी फळे विक्रेत्यांना मुभा देण्यात येणार आहे. अन्य वेळेत व्यापारी आल्यास ग्रामपंचायत व बाजार समिती आदेशानुसार सदर बंदी करण्यात आली आहे याची नोंद फेरीवाले विक्रेते व्यापाऱ्यांनी घ्यावी. 】
