भाजप केंद्रीय नेते अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करा.- आजरा ठाकरे सेनेची मागणी.
आजरा.- प्रतिनिधी.
आजरा येथील उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आजरा पोलीस स्टेशन येथे भाजप नेते अमित शहा यांच्यावर गुन्हा दाखल करावा असे निवेदन दिलेले आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की.
कोल्हापूर येथे झालेल्या भाजप केंद्रीय नेते अमित शहा यांच्या मेळाव्यामध्ये श्री शहा यांनी पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करताना लज्जास्पद “तळवे चाटले” असे वक्तव्य व शिवीगाळही केली आहे. यामुळे पक्षप्रमुखांची व अम्हा तमाम महाराष्ट्रातील शिवसैनिकांची मानहानी झाली आहे. अमित शहा यांच्या विरोधात गुन्हा नोंद करून योग्य ती कारवाई करावी असे दिलेल्या निवेदन म्हटले आहे. या निवेदनावर उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, तालुकाप्रमुख युवराज पोवार, शहर प्रमुख ओमकार माद्याळकर, युवा सेना महेश पाटील यांच्या सह्या आहेत.
