Homeकोंकण - ठाणेइ.१२ बोर्ड परिक्षा आजरा केंद्राची तयारी पुर्ण. - प्राचार्य.डॉ. ए.एन.सादळे,

इ.१२ बोर्ड परिक्षा आजरा केंद्राची तयारी पुर्ण. – प्राचार्य.डॉ. ए.एन.सादळे,

इ.१२ बोर्ड परिक्षा आजरा केंद्राची तयारी पुर्ण. – प्राचार्य.डॉ. ए.एन.सादळे,

आजरा.- प्रतिनिधी.

राज्यात होत असलेली इ १२ वी बोर्ड परिक्षा २१ फेब्रुवारी २०२३ पासून सुरु होत असून येथील आजरा केंद्र ( ०५३१ ) आजरा महाविद्यालय आजरा या ठिकाणी एकुण ८८६ परिक्षार्थी प्रविष्ट होत आहेत. या केंद्र अंतर्गत आजरा जुनिअर कॉलेज, एच.एच.सी. व्होकेशनल, व्यंकटराव जुनिअर कॉलेज, पंडित दीनदयाळ जुनिअर कॉलेज, डॉ. झाकीर हुसेन जुनिअर कॉलेज, ओम पॅरामेडिकल कॉलेज या ठिकाणाचा समावेश होतो. तरी एच.एच.सी.परिक्षार्थी प्रविष्ट होत असलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या शाळेची संबंधित संपर्क करून केंद्रावर वेळेवर उपस्थित राहावे. यावर्षीची परीक्षा ही शासनाच्या कॉपीमुक्त अभियाना अंतर्गत पार पाडली जाणार असून.परिक्षार्थीनी सकाळच्या सत्रात १०.३० पुर्वी व दुपारच्या सत्रात २.३० पुर्वी परीक्षा केंद्रावर आपले प्रवेश पत्र व कॉलेज ओळखपत्रसह हजर राहणे बंधनकारक आहे. असे आवाहन आजरा महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. ए.एन.सादळे, केंद्रप्रमुख डी.पी. सकपाळ, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, परिवेक्षक मनोज देसाई, उपकेंद्र संचालक एम. एस.पाटील,एस.व्ही पारळे यांनी केले आहे. 【 केंद्र पातळीवर बोर्ड विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हेल्पलाइन नं. ९५७९६६०२४८, ९९११८२९६९६, ०३३२३ – २४६३७२ या क्रमांकावर संपर्क साधावा. 】

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.