Homeकोंकण - ठाणेशंभर टक्के पुनर्वसन मगच घळभरणीचे काम .- सर्फनाला प्रकल्पग्रस्त धरणग्रस्तांचा निर्धार. (आधी...

शंभर टक्के पुनर्वसन मगच घळभरणीचे काम .- सर्फनाला प्रकल्पग्रस्त धरणग्रस्तांचा निर्धार. (आधी पुनर्वसन मगच धरण हा शासन निर्णय असताना पाटबंधारे खाते नियम धाब्यावर बसवून घळ भरणी करण्याचे करते कारस्थान.)

शंभर टक्के पुनर्वसन मगच घळभरणीचे काम .-
सर्फनाला प्रकल्पग्रस्त धरणग्रस्तांचा निर्धार.आधी पुनर्वसन मगच धरण हा शासन निर्णय असताना पाटबंधारे खाते नियम धाब्यावर बसवून घळ भरणी करण्याचे करते कारस्थान.

आजरा – प्रतिनिधी.

आंबेओहळ धरणातील शंभरहुन अधिक धरणग्रस्तांचे पुनर्वसन न करताच धरणात पाणी साठवले गेले, उचंगी धरणातही पुनर्वसन पूर्ण न करता पोलीस बंदोबस्तात घळ – भरणीचे काम केले. हा सगळा अनुभव लक्षात घेऊन सर्फनाला प्रकलपातील सर्व प्रकल्पग्रस्त कुटुंबाचे पुनर्वसन झाल्याखेरीज घळ – भरणीचे काम करू द्यायचे नाही. आधी पुनर्वसन मगच धरण हा कायदा धाब्यावर बसवून पोलीस बंदोबस्तात धरणाची घळ भरणी करण्याचा प्रयत्न केल्यास तालुक्यातील चित्री, उचंगी, आंबेओहळ, यरंडोळ, धनगरमोळा धरणातील सर्व धरणग्रस्त सर्फनाला धरणग्रसतांच्या पाठीशी ठाम पणे उभा राहण्याचा निर्णय आज श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यलयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ संपत देसाई होते.
यावेळी बोलताना कॉ देसाई म्हणाले कि तालुक्यातील सर्व धरणात आता पाणी अडविले आहे. अजून त्या धरणातील धरणाग्रसतांचे पुनर्वसन शिल्लक आहे. आधी पुनर्वसन मगच धरण हा शासन निर्णय असताना पाटबंधारे खाते नियम धाब्यावर बसवून घळ भरणी करण्याचे ठरवत असेल तर ते आम्ही होऊ देणार नाही. राज्यातील सर्व धरणग्रस्त आणि तालुक्यातील उचंगी, आंबेओहळ, चित्री, येरंडोल, धनगरमोळा या प्रकल्पतील प्रकल्पग्रस्त सर्फनाला धरणग्रसतांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील. सर्व प्रकारच्या संघर्षासाठी आम्ही आता तयार आहोत असेही ते म्हणाले. यावेळी दशरथ घुरे, विष्णू मांजरेकर, नारायण भडांगे, सचिन पावले, शिवाजी येजरे, अशोक बांदेकर, शांतराम लाड, बाळू दोरुगडे, भीमराव माधव, प्रकाश शेटगे, अमरसिंग ढोकरे, बाळू जाधव यांच्यासह चित्री, उचंगी, आंबेओहळ, येरंडोल, धनगरमोळा धरणातील धरणग्रस्त प्रतिनिधी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.