आजरा सरपंच परिषदेच्या वतीने नूतन सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कार. – होणार पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या हस्ते ३० जानेवारी रोजी. – सर्वांनी उपस्थित राहण्याचे सरपंच परिषदेचे आवाहन.
आजरा. – प्रतिनिधी.
आजरा येथील सरपंच परिषद महाराष्ट्र यांच्या वतीने लोकनियुक्त सरपंच म्हणून सलग पाच वर्षासाठी निवडून आल्याबद्दल त्यांचे स्वागत पद्मश्री डॉ. पोपटराव पवार यांच्या हस्ते व प्रदेशाध्यक्ष दत्ता भाऊ काकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत ३० जानेवारी २०२३ रोजी गंगामाई वाचन मंदिर आजरा येथे सकाळी १० वा. भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित केला असल्याची माहिती आजरा तालुका सरपंच परिषद मुंबई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.
दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे . तालुक्यातील कृषी, औद्योगिक, आरोग्य, शैक्षणिक व पायाभूत सुविधांचा विकास होणे गरजेचा आहे. आजरा तालुक्यातील सर्व गावचे सरपंच तरुण होतकरू सुशिक्षित व विकासाच्या ध्यास घेतलेले आहेत. त्यांनी आजरा तालुक्याच्या सार्वजनिक विकासाला गती मिळेल असा सरपंच परिषदेचा विश्वास आहे. या अनुषंगाने गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहून त्यानुसार आपण विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी नेहमीच प्रयत्न करीत असलेले सर्व सरपंच तसेच गावातील रस्ते, विज, पाणी गटर्स, या विकासाबरोबर शिक्षण आरोग्य व उपजीविकेची साधने या जीवनाच्या विविध पैलूसाठी काम करतात वेगळी वाट शोधून नाविन्यपूर्ण विकासाचा ध्यास घेतल्यास गावचे गावपण जपत विकासाकडे गावाला घेऊन जाण्याचे विकासात्मक काम आपल्या हातून घडत असल्याने आपल्या कार्याला शुभेच्छा व अभिनंदन करण्यासाठी आपल्या गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य यांच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे. असे आवाहन आजरा सरपंच परिषद महाराष्ट्र यांनी केले आहे.
