Homeकोल्हापूर - प. महाराष्ट्रघरकुल पात्र लाभार्थ्यांचा समरजितसिंह घाटगेच्या हस्ते शील्ड देऊन सत्कार संपन्न. - लाभार्थ्यांच्या...

घरकुल पात्र लाभार्थ्यांचा समरजितसिंह घाटगेच्या हस्ते शील्ड देऊन सत्कार संपन्न. – लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे माझ्यासाठी आशीर्वाद. – समरजीत घाटगे

घरकुल पात्र लाभार्थ्यांचा समरजीत घाटगे यांच्या हस्ते शील्ड देऊन सत्कार संपन्न. – लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजे माझ्यासाठी आशीर्वाद. – समरजितसिंह घाटगे

कागल. – प्रतिनिधी.

कागल विधानसभा मतदार संघातील घरकुल पात्र लाभार्थी यांचा शाहू कारखाना कार्यालयात भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते दि २६/१/२०२३ रोजी सत्कार संपन्न झाला.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय कोल्हापूर अटल बांधकाम कामगार आवास योजना अंतर्गत कागल विधानसभा मतदार संघातील ४९ पात्र लाभार्थ्यांचा
भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी कागल येथे घरकुलाची प्रतिकृती असलेले शील्ड देऊन स्वागत केले. स्वागत व प्रास्ताविक प्रताप पाटील यांनी केले. यावेळी समरजीत घाटगे म्हणाले विकास कामासोबत मतदार संघातील नागरिकांच्या घरगुती अडचणी देखील पाहणे हे लोकप्रतिनिधीचे कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधी हा विकास कामे करण्यासाठीच असतो पण आज आपल्या सर्वांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान वाटतं की आपल्याला घरकुलासाठी शासनाकडून दोन लाखाची मदत मिळणार आहे. व त्या कामी आमचा हातभार लागला हाच आमच्यासाठी आपला आशीर्वाद असेल यापुढेही आपली कोणतीही गावच्या विकासाबाबत किंवा घरगुती काम असतील तर कधीही अडचण वाटल्यास नेहमी दरवाजा उघडा आहे. आपली हाक आमची साथ बारा महिने चोवीस तास आपल्या सेवेसाठी तप्तर आहोत. गोरगरीब जनतेची सेवा करणे हेच माझे पहिले कर्तव्य आहे. असे यावेळी श्री घाटगे म्हणाले
तर यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मोफतचा श्रेय घेणाऱ्यांचा निषेध केला. या सत्कार समारंभ कार्यक्रमासाठी घरकुल योजनेचे व्यवस्थापक प्रताप पाटील तसेच शाहु बँकेचे चेअरमन श्री पाटील व्हा. चेअरमन श्री घोरपडे संचालक श्री जाधव, मडलगे लोकमान्य समूहाचे प्रमुख जनार्दन निऊगरे, लोकमान्य दूध संस्थेचे उपाध्यक्ष रणजित मोहिते, कागल विधानसभा मतदारसंघातील भाजपचे व राजे गटाचे सर्व सरपंच, पात्र लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.