Homeकोंकण - ठाणेदिलासादायक : राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश येतंय. मुंबईसह 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आलेख...

दिलासादायक : राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश येतंय. मुंबईसह 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आलेख घसरला.

दिलासादायक :
राज्य सरकारच्या प्रयत्नांना यश येतंय. मुंबईसह 12 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा आलेख घसरला

मुंबई, ०४ मे.

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेला लॉकडाऊन 15 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. राज्यात आज दिवसभरात 59 हजार 500 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. तर गेल्या 24 तासांत राज्यात 48 हजार 621 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

राज्यात आज 567 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या आकडेवारीसह राज्यातील एकूण कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 40 लाख 41 हजार 158 झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 84.7 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर एकूण कोरोना रुग्णांची संख्या 47 लाख 71 हजार 22 वर पोहोचली आहे. दुसरीकडे कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे निर्माण झालेल्या संकटामध्ये एक दिलासादायक बातमी आहे.महाराष्ट्रात नव्या रुग्णांमध्ये घट होत आहे. राज्यात मुंबई , ठाणे, औरंगाबाद, जळगाव सह १२ जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांचा आकडा घटतांना दिसत आहे. महाराष्ट्रासह १३ राज्यांमध्येही कोरोना रुग्णांचा आलेख सपाट होत असून या राज्यांमध्ये लवकरच नव्या रुग्णांचा आलेख घटतांना दिसू शकेल, अशी आशा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने सह सचिव लव अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. त्यांनी गेल्या पाच आठवड्यांचा आलेख सादर केला. ते म्हणाले, महाराष्ट्रात १२ जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांची संख्या घटतांना दिसत आहे.आलेखानुसार शहर, मुंबई उपनगर, ठाणे, औरंगाबाद, जळगाव, नांदेड, लातूर, नंदूरबार, वाशिम, भंडारा, धुळे आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये नव्या रुग्णांची नोंद कमी झाल्याचे दिसत आहे. यापैकी बहुतांश जिल्ह्यांमध्ये ४ ते १७ एप्रिल या कालावधी रुग्णसंख्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचल्याचे आढळले. त्यानंतर त्यात घट झालेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.