आजरा मडिलगेतील. वैद्य डॉक्टरची गळपास घेऊन विहिरीत आत्महत्या.
आजरा. प्रतिनिधी.दि.३
मडिलगे ता. आजरा येथील वैद्य डॉ. शिवाजी कुराडे वय ६२ यांनी गावाशेजारी असलेल्या कांबळे यांच्या शेतातील घुमटाच्या विहिरीत आत्महत्या केली असल्याची फिर्याद जावई शरद धनाजी बुडके वय ४१ रा. निपाणी. सद्या रा. मडिलगे यानी आजरा पोलिसात दिली आहे.
अधिक माहिती अशी की वैद्य कुराडे हे रोज पहाटे फिरायला जात होते आज सकाळी फिरायला गेल्यानंतर वेळेत परत न आल्यामुळे जावई आणि शोधाशोध केली असता गावाशेजारी असणाऱ्या घुमटाच्या विहिरीमध्ये मृतदेह आढळला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
