आजरा साखरची 15 नोव्हेंबर अखेरची ऊस बिले जमा.
आजारा. – प्रतिनिधी.
आजरा येथील आजरा सहकारी साखर कारखान्याची 15 नोव्हेंबर दि. ३०/१०/२०२२ ते १५/११/२०२२ अखेर गाळप झालेली ऊस बीले ३००० रु प्रमाणे विनाकपात ऊस उत्पादकांच्या खात्यावर जमा केले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन सुनिल शिंत्रे
आजरा साखर कारखान्याचे २५ दिवसात ७५७० मे. टन ऊस गाळपाचे उदिष्ट ठेवून ९.७० % उताऱ्याने ७१४०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
२०२२/२३ कारखान्याने ४.५ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.
यावेळी कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळाने कारखाना क्षेत्रातील व कारखाना क्षेत्राबाहेरील सर्व ऊस आजरा कारखान्याला पुरवठा करावा असे आवाहन केले आहे.
यावेळी सर्व संचालक, कार्यकारी संचालक, शेती अधिकारी, सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.