Homeकोंकण - ठाणेसंकेश्वर - बांदा रस्त्याचे काम करू देणार नाही…आज-यात शेतकरी आक्रमक -...

संकेश्वर – बांदा रस्त्याचे काम करू देणार नाही…आज-यात शेतकरी आक्रमक – विश्वासात घेण्याची मागणी, – प्रांताधिकाऱ्यांचे सहकार्याचे आवाहन

संकेश्वर – बांदा रस्त्याचे काम करू देणार नाही…आज-यात शेतकरी आक्रमक – विश्वासात घेण्याची मागणी, – प्रांताधिकाऱ्यांचे सहकार्याचे आवाहन

आजरा. – प्रतिनिधी.

केवळ वळणे व विस्तारीकरण याचा विचार न करता जेवढी शेत जमिन रस्त्यात जाते त्याची नुकसान भरपाई शासनाने द्यावी. शेतकऱ्यांना विश्वासात घेवून काम करावे. अन्यथा रस्त्याचे काम करू दिले जाणार नाही असा इशारा शेतकऱ्यांनी या वेळी दिला. रस्ता हा सर्वासाठी आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी शासन व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन भुदरगड आजराच्या प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांनी केले. आजरा शहरातील रहिवाशांनी मार्चाने येवून प्रांताधिकारी श्रीमती बारवे यांना निवेदन दिले.

येथील तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात शेतकरी, आजरा शहरवासीय व अधिकारी यांची बैठक झाली. प्रातांधिकारी श्रीमती बारवे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. महामार्ग प्राधीकरणाचे उपअभियंता टी. एस. शिरगुप्पे प्रमुख उपस्थित होते. पावर पाइंटने रस्त्याबाबत सादरीकरण अधिकाऱ्यांनी केले. या वेळी झालेल्या चर्चेत शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेत रस्त्याचे काम गाफिल ठेवून केले जात असल्याचा आरोप केला.

कॉम्रेड. संपत देसाई म्हणाले, सध्याच्या रस्त्याचा काही भाग हा शेतकऱ्यांच्या नावावर असून त्याची नुकसान भरपाई मिळाली पाहीजेत. त्याचबरोबर रस्त्याचे विस्तारीकरण व मजबूतीकरणासाठी पुन्हा आवश्यक जमिन संपादित केली तर त्याचीही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहीजेत. हा रस्ता व्यावसाईक आहे. याला टोल लावून व्यवसाय होणार आहे. त्यामुळे शेतक-यांना समृध्दी महामार्गाच्या दराने नुकसान भरपाई मिळावी. त्याचबरोबर ज्या शेतक-यांची जमिन रस्त्यात जाणार आहे. शेतकऱ्यांना स्पष्टता येण्यासाठी गावचावडीवर माहीतीचा जाहिरनामा लावावा.

कॉम्रेड गुरव म्हणाले, रस्त्याबाबत प्रशासनाने स्पष्टता ठेवलेली नाही. कोणालाही विश्वासात घेतलेले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न प्रथम सोडवा मगच रस्ता करावा. कॉ. संजय तर्डेकर म्हणाले, प्रश्न सोडवण्यासाठी संघटना आहेत. शेतकऱ्यांना विश्वासात घेवून रस्त्याचे काम करा. शेतकऱ्यांचे प्रश्न पहिल्यांदा शासनाने सोडवावेत अन्यथा काम करू देणार नाही असा इशारा सुधीर देसाई यांनी दिला.


विलास नाईक यांनी रस्त्यावर पडलेले खड्डे मुजवण्याची मागणी केली. शिवाजी गुडूळकर, समीर मोरजकर, अरुण देसाई, गणपती येसणे, जयवंत थोरवतकर, बशीर दरवाजकर, गोविंद पाटील,राकेश करमळकर,विजय थोरवत, प्रकाश मोरुसकर, हंबीरराव अडकूरकर यांनी चर्चेत भाग घेतला. यावेळी जयवंतराव शिंपी, मानसिंगराव देसाई, दिनेश कृरुणकर, दत्तात्रय मोहीते, गणपतराव डोंगरे, यशवंत इंजल,संजय इंगळे,योगेश पाटील,सूरज जाधव,राजेंद्र परीट,विवेक बिल्ले,सौ.स्नेहल देसाई,सौ.लक्ष्मी भोई,सौ.राजश्री बिल्ले,सौ.मीनल इंजल,प्रकाश हरमळकर, व आजरा, गडहिंग्लज येथील शेतकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.