आजरा हरपवडेतील दोघांना मारहाण.- आजरा पोलिसात चौघांवर गुन्हा दाखल.
आजरा. प्रतिनिधी.दि.२
आजरा हरपवडे येथील अशोक शंकर जाधव वय ४० धंदा शेती. रा. हरपवडे ता. आजरा यांना व मुलगा गिरीश अशोक जाधव सोडवण्यासाठी गेला असता दोघांनाही लाथाबुक्क्यांनी सुनील मारुती मगदूम रा. बेकनाळ, दयानंद मारुती पाटील आरळगुंडी, ता. भुदरगड, सदाशिव जाधव. रा. लिगनुर ता. गडहिंग्लज, कमलेश मारुती येसादे रा.उत्तुर ता. आजरा. यामध्ये आरोपी १ याने घरातील महिला सदस्यांना त्रास देत असल्याच्या गैरसमजुतीतून शिवीगाळी करत मारहाण करून जखमी केले असल्याची फिर्याद अशोक जाधव यांनी आजरा पोलिसात दिली आहे. अधिक तपास पो.ना.चेतन घाटगे करत आहेत.
