सिंधुदुर्गला अखेर कायमस्वरूपी जिल्हा शल्यचिकित्सक
नागरगोजे यांनी स्वीकारला पदभार; चाकूरकरांच्या बदलीनंतर दीड वर्षे प्रभारी.
सिंधुदुर्गनगरी/प्रतिनीधी.
जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा कारभार डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी मंगळवारी सायंकाळी स्वीकारला. डॉ धनंजय चाकूरकर यांची बदली झाल्यानंतर सुमारे दीड वर्ष हा कारभार प्रभारी म्हणून डॉ श्रीपाद पाटील सांभाळत होते. डॉ नागरगोजे यांच्या नियुक्तीमुळे जिल्हा रुग्णालयाला कायमस्वरूपी जिल्हा शल्य चिकित्सक उपलब्ध झाले आहेत. दरम्यान, २ दिवसापुर्वी रिक्त असलेल्या या जागेवर डॉ अशोक नांदापुरकर हजर झाले होते. परंतु शासनाने नांदापूरकर यांना बढती दिली असून त्यांना पुणे येथे आरोग्य उपसंचालक म्हणून नियुक्ती दिली आहे. दरम्यान, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डाँ श्रीपाद पाटील यांनी कोरोना काळापासून गेली दिड वर्ष या पदाचा कार्यभार सांभाळत चांगली रुग्णसेवा दिली होती.