Homeकोंकण - ठाणेकृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल.- पोलीस महासंचालकांना...

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल.- पोलीस महासंचालकांना कायदेशीर कारवाई करण्याची सूचना

कृषीमंत्री अब्दुल सत्तारांच्या वादग्रस्त वक्तव्याची राज्य महिला आयोगाकडून गंभीर दखल.- पोलीस महासंचालकांना कायदेशीर कारवाई करण्याची सूचना

मुंबई :- प्रतिनिधी.

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभरात तसंच मुंबईतल्या अब्दुल सत्तार यांच्या शासकीय बंगल्याबाहेर आंदोलन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेत सत्तारांचे कान टोचले. आता राज्य महिला आयोगानेदेखील याची गंभीर दखल घेतली असून पोलीस महासंचालकांना कायदेशीर कारवाई करण्याची सूचना करण्यात आली आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत अपमानास्पद उद्घार काढल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाली आहे. महिलांना अपमानास्पद वागणूक देत, आक्षेपार्ह विधाने करत त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणे, कमी लेखणे, कर्तुत्वहनन करणाऱ्या अशा वक्तव्याची आयोगाने दखल घेतली आहे. याप्रकरणी राज्याचे पोलिस महासंचालकांनी कायदेशीर कारवाई करावी आणि त्याचा अहवाल तात्काळ सादर करावा असे आयोगाकडून सुचना देण्यात आली आहे, असं ट्विट महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावरून आक्रमक झाली आहे. पुढच्या 24 तासांमध्ये अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा राष्ट्रवादीच्या रोषाला सामोरं जावं लागेल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. दरम्यान अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यावर उद्योगमंत्री आणि त्यांचेच सहकारी उदय सामंत यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. अब्दुल सत्तार यांनी वापरलेल्या शब्दाचं मी समर्थन करत नाही. राजकारणात आरोप-प्रत्यारोप होत असतात, मात्र अब्दुल सत्तार यांनी टीका करताना चुकीचा शब्द वापरला,असं मत उदय सामंत यांनी व्यक्त केलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.