Homeकोंकण - ठाणेअब्दुल सत्तारचा जाहीर निषेध.उत्तूर जि.प.मतदारसंघ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध.

अब्दुल सत्तारचा जाहीर निषेध.उत्तूर जि.प.मतदारसंघ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध.

अब्दुल सत्तारचा जाहीर निषेध.
उत्तूर जि.प.मतदारसंघ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध निदर्शने.

आजरा. – प्रतिनिधी.

अब्दुल सत्तारचा जाहीर निषेध
उत्तूर जि. प. मतदारसंघ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संसदरत्न खासदार आमच्या ताई सौ सुप्रीया ताई सुळे यांच्या बद्दल मंत्री अब्दुल सत्तार याने जे वक्तव्य केले त्याचा जाहीर निषेध करण्यासाठी मंगळवार दि. ८ रोजी सकाळी उत्तूर बसस्थानक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसच्या वतीने निषेध करत घोषणाबाजी करण्यात आला.

यावेळी कागल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष वसंतराव धुरे ,पंचायत समिती सदस्य शीरीष देसाई, राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विठ्ठल उत्तूरकर , उपाध्यक्ष सुनील जोशीलकर , सचिव आनंदराव घाटगे यांनी निषेध व्यक्त करताना मंत्री अब्दूल सत्तारच्या राजीनाम्याची मागणी केली असून जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत राज्यभर अशी आंदोलने होतच राहतील असा इशारा दिला.

मुर्दा बाद …. मुर्दा बाद .. अब्दुल सत्तार मुर्दा बाद .. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो .. सुप्रीया ताई तुम आगे बडो हम सभ भाई तुमारे साथ है अशा प्रकारच्या घोषणा देत निषेध व्यक्त करणेत आला .
यावेळी संघटक सुधीर सावंत, तुषार घोरपडे ,शुभम धुरे ,सुजीत लोखंडे, चंद्रकांत घेवडे ,रामदास साठे, नेताजी पाटील ,सदाशिव पाटील ,महेंद्र कामत , प्रताप अस्वले ,संजय गाडे, भीवा जाधव ,रामदास आजगेकर , भास्कर लोहार,अब्दुल देसाई, मिलींद बरगे ,मारुती देसाई , उदय खोराटे , दयानंद पोवार , प्रभाकर कांबळे , वैभव सावेकर, जोतीबा घेवडे , मनोज भाईगडे , दिलावर लाटवाले ,दिलीप सुतार, निरंजन कडगांवकर, संदेश ऱ्हाटवळ, राजेश पाटील, ओंमकर घाटगे, तुषार आयवाळे व राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments

error: सावधान!!! या वेबसाईट वरील लेख हेय कॉपीराईट एक्ट खाली संरक्षित केलेले आहेत.