पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त सापडला. – राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
👉गृह विभागाचे आदेश.
मुंबई :- प्रतिनिधी.
राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश गृह विभागाने काढला आहे. यामध्ये 109 वरिष्ट पोलिस आधिकाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत. पोलिस उपायुक्त आणि पोलिस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आलाय.या बदल्यांमध्ये अनेक पोलिस अधिकारी मुंबईतून बाहेर पाठविण्यात आले आहेत. तर बाहेरून देखील अनेक अधिकारी मुंबईत रुजू होणार आहेत.
मुंबई पोलीस दलात बदल
गृह विभागाने जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार मुंबई पोलीस दलात किमान 14 पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. पोलिस अधिकारी प्रणय अशोक यांची मुंबईहून नवी मुंबईला तर मंजुनाथ शिंगे यांची सहायक पोलिस महानिरीक्षक म्हणून राज्य पोलिस महासंचालक कार्यलयात नियुक्ती करण्यात आली आहे.तर आयपीएस अधिकारी अभिनव देशमुख, एम रामकुमार, अनिल पारसकर, मनोज पाटील, अमोघ गावकर, तेजस्वी सातपुते आणि गौरव सिंग यांची मुंबई पोलिसांत बदली करण्यात आली आहे. प्रवीण मुंढे, दीक्षितकुमार गेडाम, मंगेश शिंदे, अजय बन्सल, मोहित गर्ग, पुरुषोत्तम कराड यांचाही आदेशानुसार मुंबई पोलिसात बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
वादग्रस्त अधिकारी पठाणांचा कमबॅक
पोलीस उपायुक्त अकबर पठाण हेही मुंबई पोलिस दलात परतले आहेत. एका बिल्डरने दाखल केलेल्या तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलिस स्टेशनने पठाण, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परम बीर सिंग, इतर चार पोलिस अधिकारी आणि इतर दोघांविरुद्ध खंडणी व इतर आरोपांसाठी गुन्हा दाखल केला होता. पठाण यांची नाशिक येथील पोलिसांच्या नागरी हक्क प्रतिबंधक विभागात (पीसीआर) बदली करण्यात आली.
दरम्यान, ज्या अधिकाऱ्यांची बदली झाली त्यांनी मिळालेल्या नव्या ठिकाणी तत्काळ रुजू व्हावे, असे आदेश गृह विभागाने दिले आहेत. राज्यात पोलिस भरतीची प्रक्रिया देखील येत्या काही दिवसांत सुरु होणार आहे. त्यामुळे बदली झालेले वरिष्ठ अधिकारी पुढील दोन ते तीन दिवसांत बदलीच्या ठिकाणी हजर होतील.
प्रियांका नारनवरे, भाग्यश्री नवटके, पौर्णिमा गायकवाड, नम्रता जी. पाटील, राहुल उत्तम श्रीरामे, सागर पाटील, विवेक पाटील, तेजस्वी सातपुते, मनोज पाटील, स्वप्ना गोरे, प्रकाश गायकवाड, दिपाली काळे यांच्यासह राज्यातील 109 अधिकाऱ्यांचा या बदल्यांमध्ये समावेश आहे.
दरम्यान, दिवाळीपूर्वी देखील शिंदे सरकारकडून अचानक आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यावेळी राज्यातील 23 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या आणि राज्य पोलिस सेवेतील दोन अशा 25 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, नागपूरसह अनेक शहरातील पोलिस अधिकाऱ्यांचा या बदल्यांमध्ये समावेश होता. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यानंतर पोलिस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत.
पुणे शहरातील नवीन पोलिस उपायुक्त नियुक्ती आणि इतर बदल्या पुढीलप्रमाणे :-
ए.एच. चवरीया, पोलिस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग (सी आय डी)
संदीप सिंह गिल्ल (पोलिस उपायुक्त)
राजेश बनसोडे, पोलिस अधीक्षक, बिनतारी संदेश (वायरलेस)
स्मार्तना पाटील (पोलिस उपायुक्त)
अमोल तांबे, अधीक्षक, लाचलुचपत विभाग
सुहेल शर्मा (पोलिस उपायुक्त)
शशिकांत बोराटे (पोलिस उपायुक्त)
विक्रांत देशमुख (पोलिस उपायुक्त)
राजलक्ष्मी शिवणकर, पोलिस अधीक्षक, लोहमार्ग
अमोल झेंडे (पोलिस उपायुक्त)
विजय मगर (पोलिस उपायुक्त)